Subscribe:

Ads 468x60px

.

Tuesday 11 October 2011

स्पर्श प्रेमाचा, विश्वासाचा आणि मुहुर्तमेढ एका शुभकार्याची : "मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !

जो जे वांछिल तो ते लाहो ! संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वराजवळ सकळ चराचरासाठी असे व्यापक पसायदान मागितले होते. जगात आजुबाजुला पसरलेली विषमता, गरीबी पाहून कधी कधी असे वाटायला लागते की ज्ञानदेवांची मागणी त्या सर्वव्यापक परमेशाजवळ पोहोचलीच नाही की काय कोण जाणे? पण जसजसे आपण समाजाच्या अधिकाधिक जवळ जायला लागतो, त्याच्याशी एकरुप व्हायचा प्रयत्न करतो तसतसे त्या परमेशाची कारगुजारी लक्षात यायला लागते आणि मग लक्षात येते की नाही..., तो जागाच आहे आणि आपल्या लेकरांवर लक्ष ठेवून आहे. आत्ता सगळीकडे एकाच वेळी असणे त्यालाही कार्यबाहुल्यामुळे जड जात असेल कदाचित ;)

मग तो आपला अंश आपल्या प्रतिनिधींच्या रुपाने या पृथ्वीवर पाठवतो. मग आपल्याला ओळख होते ते मदर टेरेसा, मार्टीन ल्युथर किंग, स्वामी विवेकानंद, हेलन केलर, बाबा आमटे आणि त्यांचे कुटूंबीय, बंग दंपती, आपली सर्वांची सिंधुमाई, अवचटसर अशा जगावेगळ्या महामानवांची. पण याही पलिकडे कित्येक जण गुपचुप, कसलाही गाजावाजा न करता परमेशाने मांडून दिलेले आपले काम अगदी अव्याहतपणे करत असतात. आजुबाजुच्या समाजाची मदत झाली तर त्यालाही सोबत घेत नाहीतर ’एकला चलो रे’ म्हणत त्यांची सेवा सदोदीत चालु असते. "आलात तर तुमच्यासवे, नाही आलात तर तुमच्याशिवाय" या वृत्तीने त्यांचे कार्य कितीही विघ्ने आली तरी त्यांच्याशी दोन हात करत कायम चालु असते.

"मैत्र जिवांचे" या आपल्या सामाजिक संस्थेचे उद्घाटन करायचे ठरल्यावर अशाच एका जगावेगळ्या माणसाची गाठ पडली आणि आमचा सगळा ताठाच उतरुन गेला. "मैत्र जिवांचे" या माध्यमातून आम्ही काहीतरी सामाजिक कार्य करणार आहोत, करतो आहोत असा एक वेगळाच अहंभाव मनात घेवून वावरत असलेले आम्ही सगळे जेव्हा "स्पर्श बालग्राम' संस्थेच्या 'श्री. महेशभैय्या यादव' यांना भेटलो. तेव्हा त्यांचा साधेपणा, त्यांचं सरळ सोपं पण प्रत्यक्षात खुप मोठं असलेलं व्यक्तिमत्व पाहून, अनुभवून एका क्षणात आम्ही सगळेच जमीनीवर आलो.



सातार्‍यातल्या एका छोट्याश्या खेडेगावात राहणार्‍या महेशभैय्यानी २००५ साली अनाथ असलेल्या सुजाताशी विवाह केला. तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की पुढे जाऊन आपण इतक्या मुलांचे मातृत्व भुषवणार आहोत. सौ. सुजाता वहिनींचे आई-वडील दोघेही एडस मुळे मरण पावलेले असल्याने, वहिनींनाही एडस झालेला असणार आणि त्यांच्यामुळे तो महेशभैय्यांनाही झाला असेल या गैरसमजाने आणि तो गावात पसरू नये या भीतीने गावातील आंधळ्या समाजाने त्यांना गावातुन बहिष्कृत करून टाकले. खरेतर या अशा घटनेनंतर एखादा संतापून गेला असता. एच्.आय.व्ही. बद्दल त्याच्या मनात तीव्र घृणा निर्माण झाली असती. पण एडसबद्दल असलेले हे गैरसमज पाहून त्याबद्दल जागृती निर्माण करण्याचे महेशभैय्यांनी ठरवले. या दांपत्याने घाबरून न जाता या रोगाविरुद्धच लढायचे ठरवले. त्यांनंतर महेशभैय्या सोलापूरातील 'स्नेहालय' या संस्थेच्या माध्यमातुन सामाजिक कार्य करु लागले. तिथे त्याची पुण्याच्या 'रॉयल रोज फाऊंडेशन'च्या मुख्य श्रीमती इसाबेला मस्कारेन्हास यांच्याशी ओळख झाली. त्या दरम्यान त्यांच्या मनात एच्.आय्.व्ही. बाधित मुलांसाठी काम करण्याचा, त्यांचे पुर्णपणे पुनर्वसन म्हणजे शिक्षणापासून ते थेट त्यांना रोजगार मिळवुन देइपर्यंत सर्व जबाबदारी उचलण्याचा भैय्या आणि वहिनींनी निश्चय केला. आणि त्यातूनच मग श्री. मस्कारेन्हास यांच्या मदतीने "स्पर्श बालग्राम" ही एच.आय.व्ही. ग्रस्त अनाथ बालकांसाठी काम करणारी संस्था जन्माला आली. आज महेशभैय्यांकडे अशी १३ मुले आहेत. अजुनही सरकारची फारशी मदत नसल्याने महेशभैय्यांना म्हणजेच पर्यायाने "स्पर्श"च्या या सर्व परिवाराला मदतीची प्रचंड प्रमाणात गरज आहे. 'स्पर्श' बद्दल संपुर्ण माहिती इथे मिळू शकेल. http://www.sparshbalgram.com/






मैत्र जिवांचे....! एका नव्या पर्वाची सुरूवात !!

२ जुन २०११ रोजी मायबोलीकर मित्र आणि 'मैत्र जिवांचे' या संस्थेचे अध्यक्ष श्री. हबा यांचा मोबाईलवर मेसेज आला. "नुकतेच आपल्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला मिळाले आहे आणि येत्या दोन वर्षात "मैत्र जिवांचे" ही संस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि खरोखर काम करणारी संस्था म्हणून गणली जाईल याबद्दल मला अजिबात संशय नाही." इतर कुणाकडुन हा संदेश आला असता तर ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असते. पण हा 'हबा' होता!

तशी आमची मैत्री गेल्या ५-६ महिन्यांचीच. पण या थोडक्या कालावधीतदेखील हबाच्या दृढनिश्चयी स्वभावाची पुरेपूर ओळख झाली असल्याने माझा त्याच्या त्या संदेशावर लगेचच विश्वास बसला. गेले काही महिने आम्ही सगळेच , खासकरून हबा, 'मैत्र जिवांचे' या संकल्पनेने पछाडून गेलो होतो. त्यातही संस्थेसाठी सभासदांचे कागदपत्र गोळा करून संस्थेची नोंदणी करेपर्यंत सगळ्या कामात हबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर आम्ही सगळेच कामाला लागलो.संस्थेचे उद्घाटन कसे करायचे? उद्घाटनासाठी कुणाला बोलवायचे? संस्थेचा लोगो काय असेल? आपले घोषवाक्य काय असेल? अशा अनेक विषयावर चर्चा झाली.

अनेक वेगवेगळ्या घोषवाक्यांवर विचार झाल्यावर शेवटी साधेच पण आमचे तत्त्व नेमकेपणाने मांडणारे एक वाक्य घोषवाक्य म्हणुन निवडण्यात आले.

"निर्धार निस्वार्थ सेवेचा!"

उद्घाटन करायचे असल्याने संस्थेचा एक तात्पुरता लोगोही ठरवण्यात आला.



संस्थेची सुरूवातच असल्याने फंडींग नव्हतेच, तेव्हा सुरुवातीचा सगळा खर्च कार्यकारी मंडळाने आपल्या खिशातूनच करायचा. सभासद नोंदणी व्यतिरीक्त प्रत्येकाने शक्य तेवढी रक्कम कार्यासाठी द्यायची असे एक मत मांडण्यात आले आणि ते सगळ्यांनी उचलुनही धरले. सुरुवातीच्या कार्यक्रमासाठी आवश्यक ती रक्कम हा हा म्हणता गोळा झाली. कित्येक मायबोलीकरांनीही फोन करून, काहींनी प्रत्यक्ष भेटून प्रत्यक्ष्-अप्रत्यक्ष मदतीची खात्री दिली. या सगळ्या प्रोत्साहनाने आमचा उत्साह वाढतच होता. मग उद्घाटनासाठी बर्‍याच गोष्टींचा विचार झाला. अगदी सिंधुमाई सपकाळ तसेच अवचटसरांच्या कार्यालयाशीदेखील बोलून झाले. त्यांनीही तयारी दाखवली पण त्यांना लगेच वेळ नव्हता आणि आम्ही तर १० जुलै २०११ ही तारीख पक्की केली होती. तेव्हा कुठल्याही कारणाने ठरवलेल्या वेळापत्रकात बदल करायचा नाही असा निर्णय घेवुन आम्ही दुसरा एक पर्याय निवडला.

आम्ही आंतरजालावरून काही अशा संस्थांची माहिती मिळवली की ज्या आकाराने छोट्या आहेत, ज्यांना सरकारकडून पुरेशी मदत मिळत नाही पण मदतीची गरज तर आहे. अशा संस्था शोधताना आंतरजालावर आम्हाला "स्पर्श बालग्राम" ची माहिती मिळाली. एक दांपत्य कुठलीही सरकारी मदत नसताना स्वबळावर जवळ्-जवळ १३ अनाथ बालकांचे पालन पोषण करताहेत ही गोष्ट आदराने नतमस्तक व्हायला लावणारीच होती. त्यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे ही सर्वच्या सर्व बालके एच.आय.व्ही.बाधित आहेत हे कळल्यावर तर आम्ही हादरलोच. तिथेच पक्के झाले की उद्घाटनाचे इतर सर्व प्लान्स कॅन्सल! त्याऐवजी ती रक्कम आपण "स्पर्श"ला देवू आणि तिथेच अनौपचारिकरित्या "मैत्र जिवांचे" या आपल्या संस्थेचे उद्घाटनही करू. "स्पर्श"च्या महेशभैय्यांनी लगेच आनंदाने या गोष्टीला मान्यता दिली.

त्यांच्याच बोलण्यातून असे समजले की बर्‍याच दिवसात ही लेकरं फारशी कुठेही बाहेर पडलेली नाहीत. फक्त दररोज इथल्याच एका कार्पोरेशनच्या शाळेत जायचे एवढेच काय ते त्यांचे आउटींग. तत्क्षणी हबाने आम्हाला संदेश पाठवला की या सर्व मुलांना आपल्याला कुठेतरी छान सहलीला नेता येइल का? सगळेच सभासद आनंदाने तय्यार झाले आणि सिंहगड किंवा पानशेत असा प्लान ठरला. सकाळी लवकर उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून घ्यायचा आणि त्यानंतर सर्व मुलांना बरोबर घेवून सिंहगड किंवा पानशेतची सहल करायची असे ठरले. अर्थात मुलांना काही त्रास होणार नाही याची महेशभैय्यांनी ग्वाही दिल्यावरच. आणि अर्थातच 'मैत्र जिवांचे'चे उपाध्यक्ष डॉ. कैलासदादा गायकवाड सर्व तयारीनिशी बरोबर असणारच होते. त्यामुळे गरज पडल्यास वैद्यकीय मदतही हाताशी होतीच.

आता प्रश्न होता गाड्यांचा. आपले सर्व सभासद तसेच येणारे पाहुणे आणि श्री व सौ महेशभैय्यासहीत सर्व मुले यांना मिळुन मोठ्या तीन किंवा लहान चार्-पाच गाड्यातरी लागणार होत्या. पण तो प्रश्नही हा हा म्हणता सुटला. कैलासदादा, वहिनी आणि त्यांची छोटुली मुंबईवरून एक सुमो करुन येतो म्हणाले. मायबोलीकर श्री. मिलींद पाध्ये उर्फ भुंगा यांनीही आपली कार घेवून येण्याची खात्री दिली. हबाचे मित्र आणि संस्थेचे मार्गदर्शक श्री. दत्ता गायकवाड विट्यावरून त्यांची गाडी घेवून येणार होते त्यांनीही दिवसभर थांबण्याची ग्वाही दिली. एक उत्साही मायबोलीकर श्री. सुशांत मगर यांनीही आपली गाडी घेवून येण्याचे कबुल केले. आमचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. परंतू नेमके त्या रात्री सुशांतच्या एका मित्राला अपघात झाल्याने त्यांचे येणे कॅन्सल झाले. एक गाडी अजुन हवी होती. काय करावे हा विचार करता करता एकदम मायबोलीकर मित्र श्री. उमेश कोठीकर यांचे नाव डोळ्यासमोर आले. त्यांना सहज एक मेसेज टाकला जमेल का म्हणुन, तर त्याचा फोनच आला. कधी हवीय? कुठे हवीय? छोटी हवी की मोठी कार हवी? चला ही समस्या देखील सुटली. तुम्ही मनापासून एखादे चांगले काम करत असाल तर कुठलेही संकट तुम्हाला त्यापासून परावृत्त करू शकत नाही यांचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आणि आम्ही उद्घाटनाच्या अनौपचारिक सोहळ्यासाठी सिद्ध झालो. उम्या, मन:पूर्वक धन्यवाद रे....

रवीवार दिनांक १०-०७-२०११ ला सकाळी १०.३० वाजेपर्यंत उद्घाटनासाठी म्हणून सर्वांनी दापोडी येथील 'स्पर्श'च्या मुक्कामी भेटायचे ठरले होते. तसे एकेकजण यायला सुरूवात झाली. विट्यावरून हबाचे मित्र आणि संस्थेचे मार्गदर्शक श्री. दत्ता गायकवाड हे आदल्या रात्रीच आपल्या दोन सहकार्‍यांसहीत हबाच्या घरी मुक्कामाला आले होते. दत्ताभाऊ हे विट्यातील एका महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. पण त्याबरोबरच समाजसेवेच्या क्षेत्रातही ते चांगलेच कार्यरत आहेत. विटा, सातारा आणि कराड या भागातील "मैत्र जिवांचे" च्या सर्व कामाची जबाबदारी श्री दत्ता गायकवाड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्विकारली आहे. रविवारी सकाळी दत्ताभाऊंच्या गाडीच्या पहिल्या फेरीत मी, हबा, दत्ताभाऊ आणि त्यांचे सहकारी स्पर्शला पोहोचलो. दुसर्‍या फेरीत प्रगो उर्फ संस्थेचे खजीनदार प्रसाद गोडबोले आणि हबाचे कुटुंबीय येवुन दाखल झाले. आम्हाला अनपेक्षित अशी एक पाहुणी 'मैत्र जिवांचे'च्या परिवारात सामील झाली होती. सौ. प्र.गो. उर्फ़ 'प्राची'. दरम्यान नाशिकहून आलेले श्री. विजय पाटील उर्फ कणखर, पुण्याहून आलेले भुंगा उर्फ मिलींद पाध्ये, तसेच चनस उर्फ अर्चना मजले आपल्या कुटुंबियासहीत आणि मी आर्या उर्फ नयना मोरे आपल्या चिरंजिवांसहीत 'स्पर्श'च्या निवासी कार्यालयात येवून दाखल झालेले होते.

खरेतर सकाळी सकाळी मी आणि हबा तिथे पोहोचलो तेव्हा मी थोडा विचारातच पडलो होतो. आपल्यापुढे दैवाने काय मांडून ठेवलय याची कल्पनाही नसलेल्या त्या छोट्या-छोट्या देवदुतांना मी कसा सामोरा जाणार होतो? त्यांच्याशी काय बोलायचे, कसे बोलायचे? या संभ्रमातच होतो. पण हबाने बेल वाजवली  समोरून एका छोट्याने दार उघडले आणि 'गुडमॉर्निंग भैय्या' म्हणत आपला चिमुकला तळहात शेकहँडसाठी पुढे केला. क्षणात अजुन कितीतरी चिमुकले हात 'गुडमॉर्निंग भैय्या' म्हणत पुढे आले आणि माझ्यातला सगळा मी कुठे गळून पडला मला कळलेच नाही. एका क्षणात मनातले सगळे किंतु, सगळे प्रश्न, सारा संभ्रम गळून पडला आणि त्या लेकरांनी माझा ताबाच घेतला. मी तिथेच नेहमीप्रमाणे वज्रासनात बैठक घातली आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यात रंगून गेलो. त्यानंतर जेव्हा महेशभैय्यांनी सांगितले की बहुतेक मुले अजुन फर्स्ट स्टेजला आहेत त्यामुळे काळजी करण्यासारखे फारसे काही नाही. तेव्हा कुठे माझ्या आणि हबाच्याही जिवात जिव आला. असो...! पहिला विचार मनात आला तो म्हणजे त्यां लेकरांच्या देहाला जरूर काहीतरी विकार झालेला असेल पण त्यांची निरागस मने आणि जीवनाशी आहे त्या परिस्थीतीत सामोरे जाण्याची वृत्ती यांना मात्र मृत्युही मारु शकणार नाही. फिर एडस किस झाड की पत्ती?

आमचा मुळ कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी त्या मुलांनी मायबोलीकर चनस, मी आर्या तसेच चनसचे बंधु, तिच्या आई, सौ. हबा आणि प्राची यांचा ताबा घेवून टाकला होत्या. नव्या तायांना मग कुठे गाणं म्हणून दाखव, कुठे नाच करून दाखव असा आपला स्वतंत्रच कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता.







आमच्या कार्यक्रमाची सुरुवात त्या चिमण्यांच्या सुश्राव्य आणि खणखणीत प्रार्थनेने झाली. "ए मालिक तेरे बंदे हम.....!" म्हणत त्या परमेशाला साद घालत त्यांनी ’मैत्र जिवांचे’ या सामाजिक संस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एक देखणी आणि पवित्र सुरूवात करून दिली.





या प्रार्थनेची दृक-श्राव्य चित्रफित



आधीच ठरवल्याप्रमाणे डॉ. कैलासजी आणि दत्ताभाऊ तसेच महेशभैय्या यांच्या हस्ते श्री. ज्ञानेश्वरमाऊलींच्या प्रतिमेचे पुजन करून संस्थेचे उद्घाटन झाल्याची अनौपचारिक घोषणा करण्यात आली.







संस्थेचे नोंदणीप्रमाणपत्र सर्वांना दाखवून संस्था अधिकृतपणे कार्यरत झाल्याची श्री. हबा यांनी घोषणा केली. त्यानंतर हबाने हा विचार मनात येण्यामागची कारणे आणि भुतकाळातील काही हृदय हेलावणारे प्रसंग सांगुन 'मैत्र जिवांचे' च्या सभासदांच्या मनातली ही सामाजिक कार्याची प्रेरणा अजुनच पक्की केली.
हबाच्याही नकळत ’मैत्र जिवांचे’चा अजुन एक खंदा शिलेदार आकाराला येत होता. (हबाचा चिरंजिव शिवांशु)



ठरल्याप्रमाणे डॉक्टर आणि दत्ताभाऊंच्या हस्ते महेशभैय्यांना 'मैत्र जिवांचे' तर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटीशी रक्कम भेट म्हणून देण्यात आली. तसेच एका शुभेच्छुक मायबोलीकराने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर 'स्पर्श'च्या मुलांसाठी म्हणून घेवून दिलेली सायकला त्या लेकरांच्या स्वाधीन करण्यात आली. ती छोटीशी सायकल बघून त्या पिल्लांच्या चेहर्‍यावर उमटलेले हसू आमची आतापर्यंतची सर्व मेहनत सार्थक करून गेले. मायबोलीकर 'चनस' आणि तो अज्ञात दाता यांनी आदल्यादिवशी भर पावसात पायपीट करून या लहानग्यांसाठी ती सायकल विकत घेतली होती. त्यांचे आभार कसे आणि किती मानणार?



सायकल बघितल्यावर मात्र लेकरं सॉलीड खुश झाली.


इथेही एक गोष्ट त्या चिमण्या पिल्लांकडून शिकायला मिळाली. सायकल बघितल्यावर सुद्धा त्यांना पुढे बोलावेपर्यंत सर्वजण शांतपणे शिस्तीत बसुन होते. जेव्हा हबाने त्यांना 'वाट कसली बघता, तुमचीच आहे सायकल' म्हणून सांगितले..... त्यानंतर मग कल्ला सुरू झाला.

त्यानंतर डॉ. कैलासजी, दत्ताभाऊ आणि महेशभैय्या यांनी संस्थेचे सदस्य आणि उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. डॉ. कैलासदादांनी साध्या-सरळ शब्दात एडसबद्दल थोडी माहिती देत संस्थेतर्फे हा कार्यक्रम इथे 'स्पर्श्'च्या कार्यालयात करण्याची परवानगी दिल्याबद्दल महेशभैय्यांचे आभार मानले. आणि आपल्यापरीने शक्य त्या सर्व प्रकारच्या आर्थिक, वैद्यकीय मदतीची हमी दिली.



त्यानंतर श्री. दत्ता गायकवाड यांनी सुरू करतानाच मी बोलणार आहे पण माझे बोलणे आवश्यकतेपेक्षा जास्त वाढवून श्रोत्यांच्या मस्तकावरची शीर उडणार नाही यांची काळजी घेइन असे सांगत श्रोत्यांचा ताबा घेतला. दत्ताभाऊंशी हबाची ओळख अगदी त्याच्या स्पर्धाकाळापासुनची असल्याने त्यांच्यात असलेला स्नेह, परस्परांवरचा दृढ विश्वास दत्ताभाऊंच्या बोलण्यातुन क्षणोक्षणी जाणवत होता. अगदी थोडक्यात सामाजिक संस्थांचे काम कसे चालते याची माहिती देत शेवटी अचानकपणे दत्ताभाऊंनी संस्थेसाठी आपली जवळ जवळ २० गुंठे म्हणजे अर्धा एकर जमीन संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी देण्याची घोषना केली आणि आम्ही सगळेच चाट पडलो, भारावून गेलो. हा एक शुभ शकुनच होता संस्थेच्या भावी यशाची खात्री देणारा. त्याबरोबरच विटा, सातारा तसेच कराड या भागातील "मैत्र जिवांचे" च्या सर्व कार्याची जबाबदारी स्विकारून शक्य ती सर्व मदत करण्याचे दत्ताभाऊंनी वचन दिले. आपले मनःपूर्वक आभार दत्ताभाऊ !!



यानंतर बोलायला उभे राहीले ते महेशभैय्या !



आपण काही , खुप मोठं काम करतोय, काही जगावेगळं करतोय याची कसलीही खुण न दर्शवता, कुठलाही ताठा न मिरवता त्यांनी 'स्पर्श' बद्दल माहिती दिली. 'स्पर्श'चा जन्म कसा झाला हे सांगतानाच त्यांनी 'सामाजिक संस्था' कशा चालतात? कशा चालवायला हव्यात? याबद्दलही मोलाचे माहिती दिली. हे सर्व सांगताना त्यांनी एक अतिशय बहुमुल्य विचार मांडला.

"सामाजिक संस्था म्हणजे समाजाची, समाजाच्या हितासाठी काम करणारी संस्था. आपण फक्त त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणुन काम करत असतो. आपले काम कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता करत राहणे एवढेच आपले कर्तव्य."

त्यांच्याकडे, त्यांच्या 'स्पर्श'मधील लेकरांकडे बघताना हा विचार त्यांनी आणि त्यांच्या सौ.नी आपल्या तनमनात पुर्णपणे मुरवला आहे याची खात्री पटत होती. शेवटी 'स्पर्श बालग्राम' ला असलेल्या मदतीच्या गरजेची पुन्हा एकदा सर्वांना कल्पना देवुन शक्य होइल ती सर्व मदत करण्याची कळकळीची विनंती महेशभैय्यांनी उपस्थितांना केली. सहृदय मायबोलीकरांना एकच विनम्र विचारणा की आपल्याला या चिमण्यांसाठी अजुन काही करता येइल का?





खरेतर सर्वच आपले होते. एका विचाराने, समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी लक्षात घेवून एकत्र आलेले समविचारी लोक होते त्यामुळे कुणाचेही आभार वगैरे मानण्याची आवश्यकता नव्हती. तरीही एक औपचारिकता म्हणुन हबाने आभार प्रदर्शन उरकुन घेतले आणि अल्पोपहाराची घोषणा केली. मी आर्या यांनी मुलांचे वय लक्षात घेवून त्यांच्यासाठी केक आनि चिवडा असा अल्पोपहाराचा बेत आखला होता. इथे थोडेसे खाऊन घ्यायचे आणि बाहेर पडल्यावर एखाद्या हॉटेलात जेवण करायचे असा बेत होता. त्यामुळे मुलांनी पटापटा केक संपवले आणि सहलीसाठी तयार व्हायची तयारी, धावपळ सुरू झाली.

त्यानंतर काही मुले आणि मायबोलीकर डॉक्टरांच्या गाडीत, काही मुले आणि श्री व सौ. महेशभैय्या आणि चनसचे बंधुराज उमेशने पाठवलेल्या गाडीत, काहीजण मिलिंदच्या गाडीत तर उरलेले दत्ताभाऊंच्या गाडीत असे बसून आमची गँग सिंहगडाच्या स्वारीवर निघाली. खडकीहून निघून मजल दरमजल करत सिंहगडाच्या रस्त्याला लागल्यावर तिन्ही गाड्या एकामागोमाग चालल्या होत्या. कधी एकमेकांना ओव्हरटेक केला की सगळी मुलं जोरजोरात कल्ला करत होती, त्यामुळे गाडी चालवताना खूपच मज्जा येत होती.



एव्हाना पावसाला सुरूवात झाली होती. आजुबाजुला असलेल्या हिरवाईचा आनंद घेत आम्ही सिंहगडाच्या मार्गाला लागलो.















साधारण ३.१५ च्या सुमाराला सिंहगडाच्या पायथ्याशी पोचलो. खाली उतरणार्‍या आणि वर जाणार्‍या गाड्यांनी ट्रॅफिक जॅम झालेलं होतं. वरून येणार्‍या गाड्यांकडून कळलेल्या माहितीनुसार वरपासून लाईन पॅक आहे हे कळल्यावर मुलांच्या जेवणाचा आणि नाशिक मुंबईला परतणार्‍यांचा विचार करून आयत्यावेळी प्लॅन थोडा बदलावा लागला.

सिंहगडापासून १९ किमी असलेल्या पानशेत धरणावर जावे आणि वाटेत काही स्पॉट्स आहेत तिथे हॉल्ट घ्यायचा असे ठरवून सगळ्या गाड्या त्या दिशेने वळवल्या. वाटेतले छोटे धाबे हे बहुतेक ठिकाणी मद्यपान पुरवत असल्याने तिथे मुलांना नेणे शक्य नव्हते. मग काही किमी गेल्यावर एका सुंदर स्पॉटवर जिथे अथांग जलाशय आहे आणि मुलांना खेळायला हिरवळ आहे, लँडस्केपिंग केलेले आहे अश्या ठिकाणी आम्ही थांबलो. मुलांनी मनसोक्त पावसात भिजत खेळण्याचा आनंद लुटला. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून खुपच समाधान झाले. आपल्या सभासदांनी पण बहुदा हा स्पॉट पहिल्यांदाच पाहिला होता त्यामुळे यथेच्च फोटोसेशन करून आम्ही पानशेतच्या मार्गाने निघालो. तिथे नेमका नेहमी हजर असणारा भजीवाला आज नव्हता नाहीतर थोडी पोटपुजा तिथेच झाली असती.



आता सर्वांनाच भुका लागल्या होत्या म्हणून मग गाड्या सुसाट मारून थेट पानशेतला पोचलो. पानशेतला जाताना प्रत्यक्ष आम्ही पोचलो ते वरसगाव धरणाच्या बोट क्लबवर.



तिथे सर्वांची जेवणाची व्यवस्था होतेय हे पाहून आधी तो कार्यक्रम उरकायचं ठरलं....... मुलांनी आणि मोठ्यांनी सगळ्यांनीच भाकरी पिठल्यावर मस्त ताव मारला. सोबतीला हवी तितकी कांदाभजी होतीच....... रिमझिम पावसाच्या साथीने मस्त पोटोबा झाला. थोडेसे इकडे तिकडे बागडत मुलांनी खूपच धमाल केली.



मुळात त्या मुलांना बाहेर फिरायला न्यायचा आणि तो आनंद द्यायचा हेतू चांगलाच सफल झाला होता. त्यांचा आनंद हीच त्याची पोचपावती होती.
या सहलीने खुश झालेला "स्पर्श बालग्रामचा' समाधानी परिवार.



मनमुराद गप्पा, शेरोशायरी आणि हुदडून झाल्यावर सगळ्यांना परतीचे वेध लागले. चुकामुक झालेले महत्वाची मंडळी आता रेंजमधे आली होती. त्यामुळे संपर्कात राहून पुन्हा परतीच्या वाटेवर एकत्र जमलो.



संध्याकाळ झाल्यावर पुन्हा सगळे 'स्पर्श' कडे , त्या चिमण्यांच्या घराकडे निघालो. प्रवासाच्या श्रमाने आता सगळीच पाखरं दमली होती. त्यातल्या एकाने तर गाडीच्या फ्रंटसीटवर माझ्या मांडीवर बसल्या बसल्याच निद्रादेवीची आराधना करायला सुरूवात केली. शेवटी स्पर्शच्या कार्यालयातच सर्व छोट्या दोस्तांसह 'मैत्र जिवांचे' परिवाराचा एक गृप फोटो घेवून दिवसाची सांगता केली.



त्या चिमण्यांचा निरोप घेताना पुन्हा एकदा भेटण्याचे वचन देत जड मनाने आम्ही 'स्पर्श' चा निरोप घेतला. दिवसभर भरपूर फिरून, खुप खेळून दमलेली पण आनंदीत झालेली ही चिमणी पाखरं मात्र हसुन "थॅंक्यु भैय्या...., लवकर परत या" म्हणत आनंदाने निरोप देत होती.

"आज या कार्यक्रमांच्या निमीत्ताने त्या लेकरांकडून आयुष्यातील सर्व संकटांशी न घाबरता, न थांबता श्रद्धेने, विश्वासाने झगडण्याचा हा खुप मोठा धडा आम्ही सगळेच शिकलो होतो."

निघताना पुन्हा एकदा हबाने सर्वांना विश्वासाने सांगितले....

"मित्रहो ही तर फक्त सुरूवात आहे, आपल्याला खुप मोठं काम करायचय आणि आपण नक्कीच यशस्वी होवू! "

मला खात्री आहे हबा, आपण नक्कीच यशस्वी होवू. एक दिवस 'मैत्र जिवांचे' ही संस्था तिच्या सेवाभावी कार्यासाठी म्हणून सर्वत्र ओळखली जाईल.

धन्यवाद.

विशाल विजय कुलकर्णी
सचिव
'मैत्र जिवांचे सामाजिक संस्था'
भ्रमणध्वनि क्र.: ९९६७६६४९१९
विरोप पत्ता : maitrajivanche.ngo@gmail.com

Monday 10 October 2011

क्षणचित्रे


"मैत्र जिवांचे सामाजिक संस्था"

"मैत्र जिवांचे" या आपल्या सामाजिक संस्थेचे उद्घाटन करायचे ठरल्यावर अशाच एका जगावेगळ्या माणसाची गाठ पडली आणि आमचा सगळा ताठाच उतरुन गेला. "मैत्र जिवांचे" या माध्यमातून आम्ही काहीतरी सामाजिक कार्य करणार आहोत, करतो आहोत असा एक वेगळाच अहंभाव मनात घेवून वावरत असलेले आम्ही सगळे जेव्हा "स्पर्श बालग्राम' संस्थेच्या 'श्री. महेशभैय्या यादव' यांना भेटलो. तेव्हा त्यांचा साधेपणा, त्यांचं सरळ सोपं पण प्रत्यक्षात खुप मोठं असलेलं व्यक्तिमत्व पाहून, अनुभवून एका क्षणात आम्ही सगळेच जमीनीवर आलो. स्पर्श च्या गोड मुलांसमवेत तो दिवस धमाल साजरा करुन आम्ही आपल्या ’मैत्र जिवांचे’ या सामाजिक संस्थेचे अनौपचारिक उद्घाटन केले. त्या दिवसाची ही क्षणचित्रे.









Tuesday 20 September 2011

मैत्र जिवांचे : माहिती पत्रक

मैत्र जिवांचे सामाजिक संस्था : माहितीपत्रक

Monday 19 September 2011

भुता परस्परे पडो | "मैत्र जिवांचे" || : उद्घाटन समारंभ!!


दिव्या दिव्यांचे सुखी त्रिकोण आपापले कोपरे उजळण्यात दंग आहेत. अंधार्‍या कोठड्यांना निराशेचा असाध्य आजार जडला आहे. उजेडाच्या गावाला प्रेमाची साद घालून अंधाराच्या क्रूर खेळाचा अंत होईल असा आशेचा कवडसा नजरेच्या टप्प्यात येत नाही. कुणी कुणाचा कुणीच नाही... जो तो ज्याचा त्याचा आहे. उजळ कोपर्‍यांना सुबक नक्षीची... तर अंधार्‍या कोठड्यांना दबक्या हुंदक्यांची सोबत आहे. दिव्याने दिवे पेटताहेत... एक गाव उजळतो आहे. अंधारात मिसळणारा अंधार आहे... अंधार अंधारतोच आहे... हसणार्‍याला दिसतात ती फक्त आसव... रडणार्‍याला उगम उमजला आहे... हसणारा पाहतो... चुकचुकतो... हळहळतो... विसरून जातो. पण रडणारा पाहतो... जाणतो... जगतो आणि जगत राहतो.

अंधारात जन्मून अंधारात जगणार्‍याला प्रकाशाची आस नसतेच असे नाही. पण त्याच्या काळ्या भाळावर एक पांढरी रेघ उमटण्यासाठी प्रकाशाच्या गावी लोकसेवेची तपश्चर्या करणारा महात्मा जन्मावा लागतो. अंधार- प्रकाशाच्या नात्याचा इतिहासच दुराव्याचा आहे. आणि जेव्हा जेव्हा पणत्यांनी अंधाराशी सामना करून आसवांना मायेन कुरवाळ तेव्हा तेव्हा मानवतेच्या पवित्र ग्रंथाला उराशी कवटाळून प्रत्यक्ष सरस्वतीनं आनंदाश्रू ढाळले.

आयुष्याचा डोंगर पोखरून संसाराच्या उंदराला जीवनाच्या कोठारावर आनंदान बागडु देणारे येतात आणि जातात. पण जनसेवेच्या पालखिसमोर श्वासांची उधळण करत बेहोश नाचणारा जातो म्हणाला तरी मनातून जात नाही. उजेडाच्या साथिने देव शोधणार्‍याला मुक्ती मिळाली पण कुट्ट अंधारात वाहती आसव ज्याला मोत्यासारखी स्वच्छ दिसली त्याला माणसं मिळाली. ज्याचं त्याचं आयुष्य ज्याचा त्याचा मार्ग... प्रत्येकाची व्याख्या... प्रत्येकाचा परमार्थ आहे.

आम्हाला संसार सोडवत नाही... आम्हाला दु:खही पाहवत नाही. आमच्या सुखात वाटा नको... पण त्यांना दु:खात एकटं सोडायचं? मनात सेवेचा दीप तेवतो आहे पण आपल्या घरात अंधार होता कामा नये... बहुतांशी लोकांना याच द्विधेत पाहिलय आणि स्वतःही अशाच विचारांनी अस्वस्थ झालोय. होत राहीन. ज्या आदर्शांचे गोडवे आपण गातो त्यांचा रस्ता चालणं अशक्यच पण आपल्याचाने होईल तेवढे तर करायलाच हवे...

मायबोलीकर झाल्यानंतर बर्‍याच गझला, कविता, कथा, ललितं लिहीली. अशाच लिखाणात ८ डिसेंबर २०१० ला एक लेख लिहीला.
लग्नानंतरचा एचआयव्ही... http://www.maayboli.com/node/21747

या लेखानंतर बरीच चर्चा झाली. लेखातील मताविषयी बोलता बोलता गाडी समाजसेवेच्या स्टॉपला आली. आणि चर्चेसोबत कृती करण्याची इच्छा असणार्‍या काही मायबोलीकरांनी एक सामाजिक संस्था सुरू करण्याचा मनोदय मांडला. अपेक्षेपेक्षा जास्त लोकांचे प्रतिसाद आले. काहिंनी प्रत्यक्ष कामाची तयारी दाखविली तर काहिंनी वेळेनुसार, सवडीनुसार येण्याचे कबूल केले. होईल न होईल अशा स्थितीत असतानाच प्रगो, विशाल कुलकर्णी, आर्या, चनस, कोमल कुंभार, विजय पाटील या लोकांनी व्हायलाच पायजे! अशी ठाम भुमिका घेतली. होईलसे वाटले तेवढ्यात डॉ. कैलास गायकवाडही मी तुमच्या पाठिशी आहे म्हणत उभा राहिले आणि संस्था स्थापन होणारच हा निर्धार झाला.

संस्थेविषयीची पहिली बैठक डॉक्टरांच्या घरी मुंबईला पार पडली. कार्यकारी मंडळ ठरले. नोंदणीची कागदपत्रे तयार झाली. संस्थेचा पत्ता म्हणून मालखेडच्या घराचा पत्ता दिला. त्यासाठी घराचा उतारा देताना आज्जीचा जीव वरखाली होत होता. ती म्हणत होती संस्थेला घर दिल्यावर माझी उच्चलबांगडीच करशीला. हातापाया पडून कसातरी उतारा मिळवला. सर्व सभासदांची कागदपत्रे आली ज्यांची नव्हती त्याना नाईलाजाने क्लार्यकारी मंडळात स्थान न देता २३/०३/२०११ ला मैत्र जिवांचेची फाईल सातारा धर्मादाय आयुक्तांकडे दाखल झाली. त्यानंतर बरेच डिटेल्स, चुका दुरूस्ती, वकील, जाहिर नोटीस, असे प्रकार झाले. नोंदणी पुर्ण होण्याचा कालावधी तिनेक महिन्याचा असतोच असे समजल्यावर आरंभशुरांच्या (माझा नंबर पहिला) उत्साहाविषयी साशंक झालो पण सुदैवाने कार्यकारी मंडाळाचा उत्साह पाच महिने आहे तसाच राहिला.

०२/०७/२०११ रोजी मैत्र जिवांचेचे नोंदणी प्रमाणपत्र हाती आले सर्वांना मेसेज केला आणि ८ दिसेंबर २०१० ला जो उत्साह होता तोच उत्साह ८ महिन्यांनी पुन्हा एकदा दिसला...

कागदाचा खेळ संपला आता कार्याची वेळ आलिये. १०/०७/२०११ ला आपल्या मैत्र जिवांचे या सामाजिक संस्थेचं उद्घाटन आहे.

लोकसेवेचा आरंभ लोकसेवेनेच....

आई वडिलांचा एड्सने मृत्यु झाल्यानंतर एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ करायला कुणीच तयार नसते अशा एड्सग्रस्त अनाथ मुलांचा आधार असलेल्या "स्पर्श बालग्राम" www.sparshbalgram.com या संस्थेला देणगी देऊन आणि तिथल्या मुलांसोबत रविवारचा काही काळ घालवून मैत्र जिवांचेचे उद्घाटन होईल.

१० जुलैला सकाळी दहा वाजेपर्यंत तिथे पोहोचायचे, संस्थेला देणगी देऊन तिथल्या मुलांच्या हातून संस्थेचे उद्घाटन करायचे असा बेत आहे. ज्याना शक्य असेल त्यानी आवश्य यावे ही विनंती.

हणमंत शिंदे
अध्यक्ष
मैत्र जिवांचे सामाजिक संस्था

मायबोली : मैत्र जिवांचे : तयारी झाली... सुरूवात करायची का?

प्रिय बंधु - भगिनींनो,

मैत्र जिवांचे या आपल्या संस्थेच्या नोंदणीचे काम पुर्ण झाले आहे. कार्यकारी मंडळ सात जणांचे असून मायबोलीवरील दोन सन्मानणीय सदस्याना स्विकृत सदस्य म्हणून घेण्याविषयी बोलणी सुरू आहेत.
दि. ०३/०५/२०११ ला सातारा धर्मादाय कार्यालयातून नोंदणी क्रमांक आपल्या हाती मिळेल. परंतू, उपाध्यक्षांशी व इतरांशी झालेल्या चर्चेनुसार त्याआधी आपली कामाची योजना तयार करणे सोयीचे होईल जेणेकरून नोंदणीचे पत्र मिळताच शुभारंभाच्या कार्यक्रमापासूनच कामाची सुरूवात करता येईल.

आपल्या सर्वांच्या उपस्थीती व मदतीशिवाय या संस्थेस लोकसेवा करण्याची ताकद मिळणे केवळ अशक्य आहे. हे बीज आपल्याच परिवारातल्या काही सदस्यांनी पेरले आहे त्याची जोपासना करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य मानुन

कृपया पहिल्या सर्वसाधारण सभेला अगत्य येणेचे करावे ही कळकळीची विनंती आहे.
पहिली सर्वसाधारण सभा :

शक्यतो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संस्थेची पहीली सर्वसाधारण सभा घेतली जाईल. या सभेत संस्थेची कार्यपध्दती, नियमावली, कार्यकारी मंडळ, कार्यक्षेत्र, कामांचे स्वरूप, विभागवार प्रतिनीधींची नियुक्ती, आर्थिक नियोजन व निधी संकलनाचे अवाहन, वार्षिक व आजीव सदस्य नोंदणी इ. गोष्टी स्पष्ट करण्यात येतील.
या पहिल्या सर्वसाधारण सभेतच संस्थेची वाटचाल निश्चीत होईल. या सभेला मायबोलीचा सदस्य असणारा कोणीही उपस्थीत राहू शकतो. काम करण्याची, तन, बुध्दी, धन आणि मनाने मायबोलीकरांच्या या प्रयत्नाला समर्थ करण्याची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाने उपस्थीत रहावे ही विनंती आहे.

आपण आपल्या संस्थेसाठी यापैकी काय करू शकता?

* इमेल वरून लोकांच्या शंकांचे निरसन करणे. (डॉक्टर/ एचआयव्हीशी निगडीत कामाचा अभ्यास, अनुभव असणारे)
* फोनवरून मार्गदर्शन करणे.(डॉक्टर/एचआयव्हीशी निगडीत कामाचा अभ्यास, अनुभव असणारे)
* विविध शासकीय योजनांची माहिती असणारे व नवीन माहिती सहज संकलीत करू शकणारे लोक.
* प्रत्यक्ष स्वतःच्या घरी किंवा ऑफिसमधे किंवा लोकांच्या घरी जाऊन मार्गदर्शन करणे.
* महिन्यातला ठराविक कालावधी प्रत्यक्ष समाजशिक्षणाचे काम करण्याची तयारी असणे.
* निधी संकलन करणे.
* विभागवार राजकीय प्रतिनिधींशी जवळीक असणारे.
* कायदेविषयक मार्गदर्शन करू शकणारे (वकील, पोलिस)
* वेगवेगळ्या विवाह संस्थांची माहिती व संपर्क असणारे लोक.
* आपल्या घरी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची इच्छा असणारे तज्ञ.

मायबोली मैत्रजिवांचे सांस्कृतिक विभाग.


लेखक, कवी, शाहीर, नाट्यलेखक.
कलाकार- पथनाट्य, लघुनाटीका, व्याख्यान, एकपात्री, कथाकथन करण्याची इच्छा असणारे.
माहितीपुस्तिका लेखन करणे.
*मायबोलीवरील प्रौढ/अनुभवी (४०+) सदस्यांनी कौंसेलर म्हणून काम करावे ही अपेक्षा आहे.
*सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद इ. इ. इ. जिल्हावार प्रतिनिधित्वा साठी त्या त्या विभागातील मायबोलीकरांनी संपर्क साधावा.
:: कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयांना व तयार केलेल्या नियमावलीला अनुसरूनच सर्व कामे होतील.:
महत्वाची सुचना : कायदेशीर दृष्ट्या सभासदत्व घेऊन संस्थेचे ओळखपत्र असणार्‍या सभासदासच प्रत्यक्ष काम करता येते.

सभेस येण्याची व काम करण्याची, मदत करण्याची इच्छा असणार्‍या मायबोलीकरांनी आपली इच्छा maitrajivanche.ngo@gmail.com येथे कळविल्यानंतर सभेचे ठिकाण पुणे की मुंबई, दिवस व वेळ ठरेल. प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

ह बा 
अध्यक्ष
मैत्र जिवांचे सामाजिक संस्था. मायबोली.

मैत्र जिवांचे : मायबोलीकरांची समाजसेवा

प्रिय बंधु-भगिनी,

पत्रास कारण की मायबोलीकरानी मिळून सुरू केलेल्या एका स्तुत्य कार्याचा शुभारंभ नजीक आला आहे.

काही दिवसांपुर्वी हबा यांनी लिहीलेल्या एचआयव्ही विषयीच्या लेखाच्या अनुशंगाने बरीच चर्चा झाली. त्या लेखाचा हा दुवा...
लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

तिथे प्रत्येकाने सामाजिक जागृतीचे महत्व, प्रत्यक्ष कार्य करण्याची इच्छा तसेच आप-आपल्या वैयक्तिक पण विविध क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा समाजाला कसा होईल इ. बाबत आपली मते मांडली. या सगळ्या सुसंवादातून एखाद्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेची स्थापना करण्याचा विचार येथे मांडला गेला.

अशी काही विधायक कल्पना समोर येताच 'शुभस्य शिघ्रम' असा विचार करुन या संस्थेसाठी काम करण्याचे आवाहन करताच बर्‍याच मायबोलीकरांनी उत्स्फुर्तपणे काम करण्याची, मदत करण्याची तयारी दाखवली. त्यात चनस, पंत, विजयजी, हबा, मी स्वतः, कैलासजी, कोमल कुंभार, मी आर्या यांसोबत इतरांचाही सहभाग होता. 

आपापसातील चर्चा आणि संवादातून हबाने मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते असा विश्वास वाटला आणि इच्छुक मायबोलीकरांची पहिली मिटींग डॉ. कैलास गायकवाड यांच्या घरी मुंबईला झाली. या मिटींगला जे हजर नव्हते त्याना फोनवरून मिटींगचा हेतू व कार्यकारी मंडळाची निवड याविषयी मते मागण्यात आली.

सर्वांचे एकमत झाल्यावर असे एक कार्यकरी मंडळ तयार झाले. ज्याचे प्राथमिक सदस्य खालीलप्रमाणे आहेत.

हबा उर्फ हणमंत शिंदे - अध्य़क्ष
डॉ. कैलासजी गायकवाड - उपाध्यक्ष
विशाल कुलकर्णी - सचिव
पंत उर्फ प्रसाद गोडबोले - खजीनदार

सदस्य -

विजय पाटील
चनस
मी आर्या
चैताली सावंत
दत्ता गायवाड
मनोज यादव

(नियोजित वेळेत कागदपत्रे न आल्यास पदांमधील बदल अपरिहार्य आहेत)

ज्यानी कसलीही अट, अडचण, किंतू परंतू समोर न आणता " <strong>चांगल्या कामाला हात घालताय तर विलंब कशाला, चलो शुरू करो यार...!</strong> " अशी भुमिका घेतली अशाच लोकांचे कार्यकारी मंडळ व्हावे याची द़क्षता घेण्यात आली. यात काही बदल अपेक्षीत आहेत का ते पाहण्यासाठी पुण्यातही कोथरूडला पुण्यातील सदस्यांची मिटींग झाली.

यानंतर सर्वांकडून संस्थेचे नाव काय असावे याबद्दल पर्याय मागविण्यात आले. त्यावर सर्वांचे खुले मतदान घेण्यात आले आणि सर्वाधिक मते मिळवून पंतानी सुचविलेले "<strong>मैत्र जिवांचे</strong>" हे नाव नक्की झाले.

आता फक्त नोंदणी व शुभारंभाचा भाग उरला आहे. बर्‍याच जणांची कागदपत्रे मिळाली आहेत उरलेले लवकरच देतील व मायबोलीकरांच्या समाजकार्याचा नारळ फुटेल. माबोवरच्या सर्व सदस्यांची साथ, मदत, आशिर्वाद आम्हास सर्वतोपरी लाभतील याची खात्री आणि विश्वास आहेच.

संस्थेची ध्येय, धोरणे व कामाच्या रुपरेषेची माहिती आम्ही लवकरच आपल्यासमोर मांडणार आहोत. बदल, मार्गदर्शन, कायदेविषयक मार्गदर्शन इ. बाबतीत संबंधीत क्षेत्रातील तज्ञ, जाणकार मंडळींनी स्वतःहून पुढे यावे व सहभागी व्हावे ही विनंती.

हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि मदतीची आवश्यकता आहे आणि ती मिळेलच याची खात्रीही आहे.

प्रिय मायबोलीकर,

<strong>एक महत्वाची बातमी देताना विलक्षण आनंद होतो आहे. संस्थेच्या नोंदणीचे काम ९० % झालेले आहे. ९० % एवढ्यासाठी की अजुन आपल्या हातात प्रमाणपत्र पडलेले नाही. येत्या १५-२० दिवसात संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आपल्या हातात येइल. त्यानंतर साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुणे किंवा मुंबई इथे एक छोटासा कार्यक्रम करुन "मैत्र जिवांचे" या सामाजिक संस्थेचे जाहीर उद्घाटन करायचा मानस आहे. त्या आधी इथे तशी सुचना दिली जाईलच. काही इच्छुकांची कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने कार्यकारी मंडळात काही बदल करावे लागले आहेत. लवकरच  अंतीम कार्यकारी मंडळाचीही घोषणा करुच.
कुणाला सहभागी व्हायची इच्छा असल्यास कृपया maitrajivanche.ngo@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच आपल्या काही सुचना, मार्गदर्शन, अनुभव शेअर करायचे असल्यास देखिल इथे खाली प्रतिसादात किंवा वरील पत्त्यावर कळवू शकता.</strong>

धन्यवाद.

कळावे,

आपला,

विशाल कुलकर्णी

एच.आय.व्ही आणि एडस् : कारणे व प्रसार

एच.आय.व्ही आणि एडस्

कारणे व प्रसार
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे हा आजार रक्तसांसर्गिकही आहे. या रोगाचे आपल्या देशातील प्रमाण वाढत आहे. पुरेशा सार्वजनिक आरोग्यसेवा नसल्याने तसेच डॉक्टरांच्या व जनतेच्या योग्य आरोग्यशिक्षणाअभावी त्याचा प्रसार आटोक्यात आणणे आपल्या देशात कठीण जात आहे. सर्वांनाच या आजाराची माहिती असणे आवश्यक आहे.
या आजारात शरीरातील संरक्षक पेशींची यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. जुलाब, ताप, न्यूमोनिया, इत्यादी आजारांनी खंगत रुग्ण दगावतो.
एचायव्ही विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीकडून, भिन्नलिंगी वा समलिंगी संबंधातून, तसेच रक्तामार्फत हा आजार पसरतो.
चुंबन, स्पर्शातून, एकत्र खाण्यातून, डासांमार्फत, अन्न-पाणी, कपडयांतून, बाळाला अंगावर पाजण्यातून हा आजार पसरत नाही.
पुरुषाच्या बाहेरख्यालीपणामुळे कुटुंबातील स्त्रीला हा आजार होण्याचा धोका वाढत आहे. यामुळे असंख्य कुटुंबामध्ये हा आजार येऊन पोचलेला आहे. लग्नाआधीचे लैंगिक संबंध सहसा गुप्त ठेवले जातात; मात्र एड्स प्रकट व्हायला वेळ लागत असल्याने लग्नाच्या वेळी सगळेच अंधारात राहतात. इथून पुढे कुंडली पाहाण्याऐवजी भावी जोडीदाराची एड्सबद्दल खात्री करणे गरजेचे होणार आहे. विवाहाबरोबर एड्सचा धोका पत्कारायचा का हा प्रश्न असेल.
प्रतिबंधक काळजी
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे.
सर्वप्रथम अनिर्बंध लैंगिक संबंध टाळणे महत्त्वाचे आहे. एकाच व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित असते. लैंगिक संबंधातली व्यक्ती एड्सग्रस्त असण्याची शक्यता असेल तर अशा संबंधात निरोध वापरावा.
अनावश्यक इंजेक्शने टाळणे महत्त्वाचे. बहुतांश इंजेक्शने अनावश्यक असतात! इंजेक्शनांसाठी वापरण्यात येणा-या सुया व सिरींज पॅकबंद असव्यात. एकदा वापरानंतर त्या मोडून टाकून द्यायला पाहिजेत.
रक्तातून हा आजार पसरत असल्याने रक्तपेढयांबद्दल कडक कायदे आहेत. आता एड्ससंबंधी चाचणी केल्याशिवाय रक्त देता येत नाही.
रक्त घेण्याची वेळ आल्यास 'निरोगी' माणसाचे रक्त घ्यावे. शक्यतो आपापल्या नात्यातल्या व्यक्ती किंवा मित्रांचे रक्त व तेही दात्याच्या रक्ताची एड्सबाबत तपासणी करूनच घ्यावे लागते. व्यावसायिक रक्तदात्यांचे रक्त हल्ली घेतले जात नाही हे चांगलेच आहे.
इंजेक्शनद्वारे मादक पदार्थ घ्यायचे व्यसन असणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. आपल्या देशात आसाम, मणिपूर, इ. भागात या प्रकारची मोठी समस्या आहे. व्यसन सुटत नसेल तर त्यांना निर्जंतुक सुया उपलब्ध करण्याची गरज आहे.
रोगनिदान

एड्सच्या विषाणूंची लागण झाल्यावर अनेक दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. इतर लिंगसांसर्गिक आजारांप्रमाणे त्याची लक्षणे लैंगिक अवयवाभोवती नसतात, हे लक्षात ठेवा.
मुख्य लक्षणे
- वजनात सतत व मोठया प्रमाणावर (10% हून जास्त) घट होणे.
- सारखे जुलाब होणे (एक महिन्याहून जास्त काळ).
- सतत ताप येत राहणे (एक महिन्याहून जास्त काळ).
इतर लक्षणे
सतत खोकला, कातडीवर खाज, वारंवार आजार, नागीण, हर्पिस,(पुरळ) तोंडातील बुरशी वाढणे, अंगावरील गाठी सुजणे व हातापायाच्या नसांना सूज येणे, इत्यादींपैकी काही खाणाखुणा आढळू शकतात. यासंबंधी इतर कुठल्याही आजाराची शक्यता नसल्यास एड्सची शक्यता धरावी.
रक्त तपासणी
एचायव्ही साठी एलायझा तपासणीने एड्स-विषाणूंविरुध्द प्रतिकण (प्रतिपिंडे-ऍंटीबॉडी) तयार झाल्या आहेत की नाहीत हे कळते. (एड्स आजार म्हणजे तक्त्यात दिलेली लक्षणे- चिन्हे असणे) संसर्ग झाल्यापासून निदान 3-4 आठवडे तपासणीत दोष आढळत नाही, त्यानंतर आढळतो. तपासणीत दोष कळल्यानंतर प्रत्यक्ष आजार व्हायला 5-10 वर्षेपर्यंत काळ जाऊ शकतो. या तपासणीत काही वेळा चूक होऊ शकते. म्हणूनच एका तपासणीवर अवलंबून न राहता दोन तपासण्या करूनच निश्चित सांगता येते.
एचायव्ही बाधित आणि एड्सग्रस्त रुग्णाची रक्ततपासणी अत्यंत महत्त्वाची असते. यात एड्स विषाणूची संख्या आणि रुग्णाची एकूण प्रतिकारशक्ती यांचा अंदाज घेतला जातो. सध्या खालील तपासण्या महत्त्वाच्या आहेत.
1. एचायव्ही एलायझा - ही विषाणू प्रतिघटकाची तपासणी आता स्वस्त आणि ब-यापैकी अचूक झाली आहे. लागण झाल्यापासून आठवडयात ही रक्ततपासणी निदर्शक (सदोष) ठरु शकते. मात्र ही शेवटी एक अदमासे तपासणी आहे. म्हणून ती दोनदा करतात. दोनदा केल्यास ती ब-यापैकी पक्की रक्ततपासणी ठरते. एलिसा तपासणीचा उपयोग चाळणी म्हणून (स्क्रिनिंग) सर्वत्र केला जातो.
2.वेस्टर्न ब्लॉट - या रक्ततपासणीमुळे एचायव्ही-एड्सचा विषाणू आहे की नाही ते कळते आणि त्याचा उपप्रकार (टाईप) कळतो. या तपासणीत विषाणूंच्या प्रथिनांची 'ओळख परेड' केली जाते. म्हणजे विषाणू आहेत की नाही याचा परिस्थितीजन्य पुरावा मिळतो.
3. सीडी फोर/सीडी4 प्रमाण - सीडी 4 हा रक्तातील पांढ-या पेशींचा एक उपप्रकार आहे. निरोगीपणात रक्तात या पेशी 500-1400 या प्रमाणात असतात. ही तपासणी प्रतिकारशक्ती व आजाराची पायरी ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. सीडी 4 पेशींचे प्रमाण जसे खाली जात राहते तशी लक्षणे-चिन्हे दिसतात. सुरुवात (500 सीडी 4 पेशी) बुरशीदाहाने होते. यानंतर (200-500 पेशी) फुप्फुसदाह व्हायला लागतो. पेशीप्रमाण जंतुदोषाने आणखी खाली गेले की अंतर्गत आजारांचे प्रमाण व प्रकार वाढत जातात. याचबरोबर टी.बी., हार्पिस-कांजण्या वगैरे आजार दिसू लागतात.
4. विषाणू-भार - रक्तातील विषाणूभार मोजणे ही एक महत्त्वाची व थेट तपासणी आहे. सीडी 4 तपासणीपेक्षा ही जास्त चांगली असली तरी ती सध्या फार महाग आहे. विषाणू-भार कमी होणे ही आजार नियंत्रणाची महत्त्वाची खूण आहे.
5. डी-24 तपासणी - ही रक्ततपासणी एलिसा तपासणीच्या आधी विंडो पिरियडमध्येच विषाणूच्या आगमनाबद्दल सांगू शकते. मात्र ही तपासणी क्वचितच केली जाते.
6. हल्ली बहुतेक लॅबमध्ये तयार किट वापरून तपासणी केली जाते. याचे तंत्र वेगळेच आहे.
उपचार
एचायव्ही केवळ विषाणू-बाधित अवस्था आहे. एड्स म्हणजे रोगलक्षणे व चिन्हे असलेली अवस्था.
खालीलपैकी कोणतीही परिस्थिती दिसल्यास उपचार सुरु करावे लागतात.
(अ) सीडी4 प्रमाण 350 च्या खाली गेल्यास.
(ब) मूळ आजाराच्या जोडीने येणारे जंतुदोष
(क) विषाणू-भार 30000 पेक्षा वाढणे.
या आजाराचे एकूण गुंतागुंतीचे स्वरुप आणि त्यातल्या कौटुंबिक, सामाजिक समस्या लक्षात घेऊन समुपदेशनाची आवश्यकता असते. केवळ औषधोपचार करणे बरोबर नाही. सध्या सर्व शासकीय रुग्णालयात समुपदेशक उपलब्ध आहेत. समुपदेशक रुग्णाला सर्व माहिती सांगून अडचणी जाणून घेऊन, योग्य सल्ला देतात.
या आजारात मधुमेह किंवा अतिरक्तदाबाप्रमाणे कायम उपचार घ्यावे लागतात. मात्र चांगल्या उपचारांमुळे हा घातक आजार आता असाध्य राहिलेला नाही, ही मोठी शास्त्रीय प्रगती आहे.
याबरोबर दर सहा महिन्याला रक्ततपासणी करून उपचाराचा उपयोग किती होतो ते तपासावे लागते. याबरोबर औषधांचे दुष्परिणाम कळण्यासाठी इतर रक्ततपासण्या पण कराव्या लागतात.
समुपदेशन व उपचार
एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यासाठी माहीतगार समुपदेशकांची गरज असते.
एच.आय.व्ही. तपासणी सदोष (पॉझिटिव्ह) आहे हे रुग्णाला सांगणे हे फार जबाबदारीचे व कौशल्याचे काम आहे. यामुळे जाणकार व्यक्तीला प्रचंड मानसिक धक्का बसू शकतो. पण काय काय करता येते याबद्दल नीट माहिती टप्प्याटप्प्याने द्यायला हवी. आजार लगेच होत नाही, त्याला अद्याप वेळ आहे हेही सांगायला हवे.
बाधित व्यक्तीच्या पती/पत्नीस (किंवा लैंगिक जोडीदारास) या संसर्गाची/आजाराची बातमी देणे आवश्यक आहे; अन्यथा प्रतिबंधक काळजी घेताच येणार नाही. मात्र हे सांगताना मानवी सहानुभूती, धीर देणे, योग्य काळजीसाठी (निरोध) नीट सल्ला देणे, इ. अनेक अंगे सांभाळावी लागतात. रुग्ण स्वतः हे करू शकल्यास उत्तमच; पक्ष समुपदेशकाची या कामात मदत घ्यायला पाहिजे.
प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार होणा-या इतर आजारांवर उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच हा दुर्धर आजार झालेल्या रुग्णास मानसिक आधाराची गरज असते, हे ओळखून त्याच्याशी सहानुभूतीने वागणे जरूरीचे असते.
एड्ससाठी अजून चांगली विषाणू-विरोधी औषधे नाहीत. काही औषधे उपलब्ध आहेत त्याने आजार लांबू शकतो. त्यांचा खर्च सध्या जास्त आहे व त्यांचे काही दुष्परिणामही होतात. एकूण यात फायदेतोटे पाहून, खर्चाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
रुग्णसेवेत काळजी घ्यावी
रुग्णालयात वा घरी रुग्णाची काळजी घेत असताना इतरांनी त्यापासून दूर राहण्याची काही गरज नाही. मात्र वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तसेच रुग्णाचे कपडे, अंथरुण वगैरेंवर रक्त सांडले असेल किंवा ते दूषित झाले असल्यास निर्जंतुक करून घ्यायला हवे.
एड्स आजार असताना क्षयरोग होण्याची शक्यता फार असते. कारण रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे एड्सच्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढायची भीती असते.
औषधोपचार
एड्ससाठी हल्ली बहुविध औषधोपचार पध्दती प्रचलित आहेत. यात तीन औषधे असतात. आता एकाच गोळीत तिन्ही औषधे असलेली उपचारपध्दती उपलब्ध आहे.
HAART म्हणजे अत्यंत परिणामकारक उपचारपध्दती. ही तीन औषधांची उपचारपध्दती असल्याने विषाणूभार वेगाने कमी होतो आणि सीडी 4 प्रमाण वाढते. या औषधोपचाराचा खर्च महिना हजार-बाराशे पर्यंत जातो. सर्वांना मोफत औषधोपचार अद्याप शक्य झालेला नाही.
काही रुग्णांच्या बाबतीत औषधोपचारांचा अपेक्षित फायदा होत नाही किंवा दुष्परिणाम जाणवायला लागतात. अशांच्या बाबतीत औषधे बदलावी लागतात. याशिवाय इतर आजारांसाठी उपचार करावा लागतो.
मातेपासून पोटातल्या गर्भाला संसर्ग होऊ नये म्हणून औषधोपचार - सुमारे 1% गरोदर स्त्रियांना एचायव्ही-एड्सची बाधा आढळते. अशावेळी गर्भपात करायचा की गर्भ वाढू द्यायचा याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. गर्भ वाढू द्यायचा असल्यास औषधोपचाराने गर्भाचा संसर्ग टाळता येतो. मात्र यात 50% यश मिळते. काही बाबतीत यश मिळत नाही.
एड्स आणि टी.बी.
एड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीस कधी ना कधी टी.बी. जंतूंची लागण होऊन गेलेलीच असते. बहुतेकांची टी.बी. लागण बरी झालेली असते पण काही जंतू शिल्लक असतातच. ते एक प्रकारे पांढ-या पेशींच्या तुरुंगात असतात. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात. त्यांची संख्या वाढायला लागते. यातूनच टी.बी. आजाराचा पुनर्जन्म होतो. म्हणूनच टी.बी. एड्सचा एक साथीदार असतो. सध्या भारतात टी.बी. रुग्णांपैकी 15% रुग्ण एड्सग्रस्त असतात.
एड्समध्ये होणारा टी.बी. फारशी लक्षणे नसलेला, झाकलेला आजार असू शकतो. मात्र त्यांच्या फुप्फुसात टी.बी.चे पुष्कळ जंतू आढळतात. ते बेडक्यात मोठया संख्येने दिसतात. फुप्फुसे मात्र क्ष-किरण चित्रात निरोगी दिसतात आणि खोकला, बेडक्यात रक्त वगैरे टी.बी.ची नेहमीची लक्षणेही दिसत नाहीत.
एड्स रुग्णांना फुप्फुस सोडून इतर टी.बी. चा आजारही सहज होऊ शकतो. यात पाठीचे मणके, जननसंस्था, मेंदू-आवरण वगैरे जागांमध्ये टी.बी. होऊ शकतो.
टी.बी.चा आजार झाला की शरीरात एड्स वेगाने वाढायला मदत होते.
एड्सच्या रुग्णांना कमी प्रतिकारशक्तीमुळे टी.बी.ची नवी जंतुलागणही सहज होऊ शकते. जेव्हा हे रुग्ण सामान्य रुग्णालयात जातात तेव्हा इतरांचे जंतू त्यांना सहज लागू शकतात.
एड्स आणि टी.बी. रोगाचे असे विशेष नाते आहेत. यामुळे एड्स असेल तर टी.बी. ची तपासणी करावी लागते. तसेच टी.बी असेल तर एड्स ची तपासणी करावी लागते.
म्हणूनच प्रत्येक एड्स रुग्णाला टी.बी. होऊ नये म्हणून 2 टी.बी. प्रतिबंधक औषधे 6 महिने देणे उपयोगाचे आहे.

विवाहपूर्व चाचणी

लग्ना आधी ही चाचणी करावी की नाही हा स्वेच्छेचा प्रश्न झाला. मुळात ही चाचणीच ऐच्छिक आहे. म्हणून ही चाचणी मोफत करण्यात येणार्‍या केंद्रास व्हीसीटीसी सेंटर ( व्हॉलुंटरी टेस्टींग अँड काउन्सेलिंग सेंटर ) असं म्हटलं जातं. पीसीआर ( पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन ) ने बिनचूक निदान होते व त्यात इन्फेक्शन विंडो पीरीयड मधे असलं तरी कळू शकतं ..म्हणजे टेस्ट तरीही पॉझिटिव्ह येते.
बरं याचा अर्थ एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींनी लग्न करु नये असा होत असेल तर ते योग्य नाही. ते सुद्धा लग्न करु शकतात.. म्हणजे नवरा -बायको दोघे जरी पॉझिटीव्ह असले तरी ते एचआयव्ही निगेटीव्ह बाळाला जन्म देवू शकतात.मग त्यांचं वैवाहिक जीवन त्यांना उपभोगू न देणं गैर ठरेल.
पण स्वतःच पॉझिटीव्ह स्टेटस लपवून दुसर्‍यास फसवणं निश्चित चूक आहे..... दुर्दैवानं त्यासाठी कायदा अस्तित्वात नाही,कायदा होवू शकत नाही.
सरते शेवटी इतकंच म्हणेन की,आपल्या देशात कायदा तितक्या पळवाटा आहेत. प्रत्येक वाहनाला पीयुसी प्रमाणपत्र अनिवार्य आहे...... पण ते कश्या पद्धतीने मिळतं हे सांगायची गरज नाही. एचआयव्ही निगेटीव्ह प्रमाणपत्र सुद्धा असंच कशावरुन मिळणार नाही?
एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी आणखी माहिती इथे मिळेल.
www.nacoonline.org
www.avert.org
अजून माहिती हवी असेल... एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी,तर माझ्याशी  maitrajivanche.ngo@gmail.com  या विरोपपत्त्यावर संपर्क करा. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर या विभागापुरता हा पूर्ण कार्यक्रम माझ्या कडून राबविला जातो.

संबंधित वेबसाईट

http://mahasacs.org/48%20NGO%20MARATHI%20LIST.pdf

या इथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेसोबत काम करणार्‍या अशासकीय संस्थांची यादि. यात या संस्थांचे पत्ते,फोन्,फॅक्स इ.इ. सगळं काही आहे.
मोफत समुपदेशन व चचणी केंद्रे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत.उदा.ठाणे जिल्ह्यात असलेल्या केंद्रांची यादि खालील प्रमाणे.
LIST OF ICTC CENTRES ( THANE)

Mahatma Gandhi Missions Med. College, Navi Mumbai
Padmashree Dr. D.Y.Patil Med. Col., Navi Mumbai
Terna Medical College, Navi Mumbai
Rajiv Gandhi Medical College, Thane
Civil Hospital, Thane
Civil Hospital, Thane
Corporation Hospital, Vashi, New Mumbai
Central Hospital, Ulhasnagar
Kalyan Dombivali Corp. Hospital
SDH, Wada
SDH, Dahanu cottage
SDH, Kasa (RH)
SDH, Manor
SDH, Virar
SDH, Murbad
SDH,Palghar
SDH, Mokhada
Indira Gandhi Hospital, Bhiwandi
General Hospital, Sector 10, Navi Mumbai
Rukhminibai Hospital, Kalyan.
SDH,Talasari
SDH,Vikramgad
SDH,Goveli
Ulhasnagar Maternity Home, Camp 4, Ulhasnagar
Airoli MCH, Navi Mumbai
Nerul MCH, Navi Mumbai
Turbhe MCH, Navi Mumbai
Sutikagriha Hospital, Tilak Path, Dombivali (W), Kalyan
Vartak Nagar Mat. Home, Thane
Health Centre, Miraroad
S.Meenathai Thakare Mat. Home, Mumbra, Thane
Health Centre, Bhayender
Mahatma Phule, Kalyan
Balkum Mat. Home, Thane
SDH, Shahapur
RH, Jawahar
महारा ष्ट्रातील सर्व केंद्रांची यादि इथे मिळेल.
http://mahasacs.org/INNER1.HTM
एच.आय.व्ही.टेस्ट आणि प्रसाराबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती इथे मिळेल.
http://www.hivtest.org/
http://www.thebody.com/testing.html

डॉ. कैलास गायकवाड
मुख्य वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई.

लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही...

आम्ही काही मायबोलीकर मित्रांनी एकत्र येवून केवळ गप्पा-टप्पा न करता काहीतरी विधायक कार्याला हात घालायचा असे ठरवले.
जिथून या नव्या पर्वाची सुरुवात झाली तो हा टप्पा ! मायबोलीकर ह बा उर्फ़ श्री. हणमंत शिंदे यांनी एक धागा टाकला मायबोलीकरांची मते आजमावण्यासाठी आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तो मुळ विचार मायबोलीकरांच्या मते आणि सल्ल्यांसहीत...

*************************************************************************************

एका लेखावरील चर्चेच्या ओघात समाजसेवेचा विषय निघाला बर्‍याच लोकांची काम करण्याची इच्छा असते पण मार्ग मिळत नाही. नेमके काय करावे ते ठरवता येत नाही. मी माझ्या 'कबिला' या त्रैमासिकाच्या मुखपृष्ठावरच एक संकल्पना मांडाली होती.
"लग्न ठरविताना शेवटचा निर्णय मुलगा मुलगी दोघांच्या एचआयव्ही एड्सच्या चाचणीनंतरच घेण्यात यावा. लग्नाच्या तारखेपुर्वीचा एचआयव्ही तपासणी अहवाल सादर केल्याशिवाय त्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देऊ नये. तसा कायदा करावा"

याविषयी सर्वांची मते जाणून घ्यायला आवडेल.

यामुळे बराच फायदा होईल. एड्सला आळा बसण्यास मदत होईल व दोघेही विश्वासाने सुरक्षीत जीवन जगतील.
कुणाला काम करायची इच्छा असेल तर नक्की संपर्क साधा. माबोच्या सहाय्याने एड्स, आरोग्य, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारी नवी एनजीओच सुरू करुयात.
*************************************************
एचआयव्ही तपासणी केंद्रे व त्यांचे संपर्क. या रोगासंदर्भाने कोणतीही शास्त्रीय माहिती. मार्गदर्शक ठरतील अशा संस्था व त्यांचे संपर्क. एकुणच या विषयाच्या संबंधित कोणतीही माहिती वा मार्गदर्शन इथे जरूर द्यावे हि नम्र विनंती.

***********************************************************************************

मायबोलीकरांची मते आणि सल्ला


अश्विनी के | 8 December, 2010 - 14:50
सध्याच्या काळात अगदी योग्य विचार. पण HIV टेस्ट रिपोर्ट हा फार कमी वेळासाठी वॅलिड असतो. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या जस्ट आधीचा रिपोर्ट घेतला पाहिजे. त्याच बरोबर वधु व वराकडल्यांनी हा अपमान वगैरे मानून घेऊ नये.
काळ बदलला आहे. आता विवाह बाह्य संबंध, विवाह पूर्व संबंध, लिव्ह इन रिलेशन्शिप्स ह्या गोष्टी निषिद्ध राहिल्या नाहियेत. पुर्वीही होत्या पण समाजाची भीड आणि स्वतःच्या मनाची लाज हा प्रकार जास्त प्रमाणात अस्तित्वात होता. आता समाजाशी काही देणंघेणं नसतंच आणि ही गोष्ट लाजिरवाणी वाटणं कमी झालं आहे, उलट पुरस्कारच होतो आहे. असुरक्षित आणि एकापेक्षा अनेकांशी संबंध येणे हे मुख्य कारण आहे.
मध्यंतरी लिलावतीमध्ये एका नातेवाईकाला बघायला गेले होते. तिथे एक ब्रेनमधे इन्फेक्शन झालेला दुसरा पेशंट सिरियस होता. त्याची बायको दिवस रात्र त्याच्या सेवेत होती. मुलांची १०वी वगैरेची महत्वाची परिक्षा चालू होती. त्या माणसाने बायकोशी नियमित प्रतारणा केलेली होती आणि त्याला HIV जडला होता. इम्युनिटी कमी असल्याने मेनेंजायटीस, टीबी वगैरेही झाला होता. तीच प्रतारणा केली गेलेली बायको नक्की कुठल्या मनस्थितीत त्याची सेवा करत होती कुणास ठाऊक?
रक्तदानाच्या बहुतेक फॉर्म्सवर लिहिलेलं असतं की काही अ‍ॅबनॉर्मल रिपोर्ट्स आल्यास दिलेल्या पत्त्यावर्/इमेल अ‍ॅड्रेसवर्/फोनवर कळवातेत्/कळवू नये. आपण 'कळवावेत' असं टिक केलं आणि काही अ‍ॅबनॉर्मल निघालं तर कळवत असतील. मी जेव्हा जेव्हा रक्तदान केलंय तेव्हा कळवायला सांगितलं होतं पण अजून एकदाही काही कळवलं गेलं नाही म्हणजे सगळं नॉर्मल आहे असं समजून चालायचं.
रक्त एच आयव्ही दूषीत आहे किंवा नाही याची चाचणी प्रत्येक रक्तपेढीने केलेली असते.... पण ही चाचणी ( एलायझा) एच आय व्हीची लागण झाल्यावर ३ ते सहा महिन्यात पॉझिटीव येते.... जर रक्तदान ह्या विंडो पिरियड मध्ये केलेले असले तर रक्त दूषीत असून सुद्धा चाचणी निगेटीव्ह येते.. व हे रक्त स्वीकारलेला काहीही चूक नसताना एच आय व्ही पॉझिटीव्ह बनतो. >>>
डॉ., या परिस्थितीत काय करायला हवे?  ते रक्तपेढीतील रक्त ६ महिने प्रिझर्व केले तर नंतर त्याची चाचणी करता येते का? म्हणजे तो पिरियड घालवला तर ती टेस्ट जास्त बरोबर येईल.
फंगस किंवा बॅक्टेरिया जसे ब्लड अगार मधे आपण वाढवू शकतो अभ्यास करण्यासाठी तसा व्हायरसही मल्टीप्लाय होत असेल का? अँटीबॉडीज नाही तयार होणार पण ६ महिन्यांदरम्यान व्हायरसची क्वांटिटी जास्त झाल्यास डिटेक्ट करता येईल का?


विषय चांगला आहे.... पण या विषयाचा आवाका फार मोठा आहे.
लग्ना आधी ही चाचणी करावी की नाही हा स्वेच्छेचा प्रश्न झाला. मुळात ही चाचणीच ऐच्छिक आहे. म्हणून ही चाचणी मोफत करण्यात येणार्‍या केंद्रास व्हीसीटीसी सेंटर ( व्हॉलुंटरी टेस्टींग अँड काउन्सेलिंग सेंटर ) असं म्हटलं जातं. पीसीआर ( पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन ) ने बिनचूक निदान होते व त्यात इन्फेक्शन विंडो पीरीयड मधे असलं तरी कळू शकतं ..म्हणजे टेस्ट तरीही पॉझिटिव्ह येते.
बरं याचा अर्थ एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तींनी लग्न करु नये असा होत असेल तर ते योग्य नाही. ते सुद्धा लग्न करु शकतात.. म्हणजे नवरा -बायको दोघे जरी पॉझिटीव्ह असले तरी ते एचआयव्ही निगेटीव्ह बाळाला जन्म देवू शकतात.मग त्यांचं वैवाहिक जीवन त्यांना उपभोगू न देणं गैर ठरेल.
पण स्वतःच पॉझिटीव्ह स्टेटस लपवून दुसर्‍यास फसवणं निश्चित चूक आहे..... दुर्दैवानं त्यासाठी कायदा अस्तित्वात नाही,कायदा होवू शकत नाही.
सरते शेवटी इतकंच म्हणेन की,आपल्या देशात कायदा तितक्या पळवाटा आहेत. प्रत्येक वाहनाला पीयुसी प्रमाणपत्र अनिवार्य आहे...... पण ते कश्या पद्धतीने मिळतं हे सांगायची गरज नाही. एचआयव्ही निगेटीव्ह प्रमाणपत्र सुद्धा असंच कशावरुन मिळणार नाही?
एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी आणखी माहिती इथे मिळेल.
www.nacoonline.org
www.avert.org
अजून माहिती हवी असेल... एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमाविषयी,तर मला विपूतून संपर्क करा...... नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर या विभागापुरता हा पूर्ण कार्यक्रम माझ्या कडून राबविला जातो.

<<<<<कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो. किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत? >>>
रक्त एच आयव्ही दूषीत आहे किंवा नाही याची चाचणी प्रत्येक रक्तपेढीने केलेली असते.... पण ही चाचणी ( एलायझा) एच आय व्हीची लागण झाल्यावर ३ ते सहा महिन्यात पॉझिटीव येते.... जर रक्तदान ह्या विंडो पिरियड मध्ये केलेले असले तर रक्त दूषीत असून सुद्धा चाचणी निगेटीव्ह येते.. व हे रक्त स्वीकारलेला काहीही चूक नसताना एच आय व्ही पॉझिटीव्ह बनतो. अरेरे
डॉक्टर, रक्तदान करताना (करायच्या आधी) काय खबरदारी घ्यावी? आपण जाणकार असल्याने, तेही लिहिले तर अधिक चांगले...नाहीतर सदहेतुने रक्तदानाला जायचे आणि आपल्यालाच काहीतरी व्हायचे
वेल... रक्तदाता रक्तदान करणेस योग्य की अयोग्य हे रक्तपेढीचे तंत्र ज्ञ व डॉक्टर ठरवतातच... आणि अश्या सुयोग्य रक्तदात्यास रक्तदानाने काहीही तोटा होत नाही......
डॉ., या परिस्थितीत काय करायला हवे? एक बावळट, मूर्ख, अडाणी प्रश्न विचारते---- ते रक्तपेढीतील रक्त ६ महिने प्रिझर्व केले तर नंतर त्याची चाचणी करता येते का? म्हणजे तो पिरियड घालवला तर ती टेस्ट जास्त बरोबर येईल.
अश्विनी..... ३ ते सहा महिन्यांनी पॉझिटीव्ह माणसाच्या शरीरात एच आय व्ही अँटीबॉडीज तयार होतात ज्या एलायझा टेस्टने डीटेक्ट होतात.... आत्ता घेतलेले रक्त सहा महिन्यांनी सुद्धा निगेटीव्हच येईल.
गौतमा.... ५० किलो वजनाचा निरोगी,व अ‍ॅनिमिक नसलेला कुणीही रक्तदान करू शकतो.... वय ५० च्या आत हवे.

अतिशय योग्य विचार. सुशिक्षित तरी योग्य खबरदारी घेतीलच पण कायदा केला तर अशिक्षितांमधे सुद्धा ह्या विषयाबद्दलची जागरूकता येईल.
HIV infection झाल्यानंतर तो लगेच डिटेक्ट होत नाही.. त्यासाठी किमान ३-६ महिन्यांचा window period (provided there is no HIV incidence in this period) द्यावा लागतो..लग्नाच्या तारखेच्या आधीचा रिपोर्ट घेऊन फारसा फायदा होणार नाही
HIV टेस्ट रिपोर्ट हा फार कमी वेळासाठी वॅलिड असतो. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या जस्ट आधीचा रिपोर्ट घेतला पाहिजे
>>>>>>>>>>>
ही दोन परस्पर विरोधी विधानं आहेत. जर तो रिपोर्ट कमी वेळासाठी वॅलिड असेल तर ३-६ महिन्याच्या आधीचा रिपोर्ट घेण्याइतपत वेळ असतो का? काही लग्न अगदी झट मंगनी पट ब्याह तत्त्वावर होतात.. काही काही लग्न नवरामुलगा अगदी एका आठवड्यासाठी भारतात येणार आहे तेवढ्यात लग्न उरकून घेऊ अशी असतात.. मग हे कसं जमायचं? अश्या अनेक केसेस आहेत जिथे ३-६ महिन्यांचा काळ नसतो... अश्यांसाठी काही उपाय आहे का?

HIV infection झाल्यानंतर तो लगेच डिटेक्ट होत नाही.. त्यासाठी किमान ३-६ महिन्यांचा window period (provided there is no HIV incidence in this period) द्यावा लागतो... आणि त्यानंतर केलेल्या टेस्टचे रिझल्ट्स निगेटिव्ह आले तरच HIV infection झाले नाहिये असं म्हणता येते..
परंतु या बाबतीत ethics चा प्रश्न येतो... रुग्णाच्या परवानगी शिवाय टेस्टचे रिझल्ट्स कोनालाही सांगितले जात नाहित सध्यातरी....
हो टेस्ट दोनदा करावी लागेल. (विंडो पिरियड लक्षात घेऊन.) आणि दुसर्‍या टेस्ट नंतर ती व्यक्ती कायम नजरेखाली ठेवावी लागेल.>>> पहिल्या टेस्टनंतरपासुनच ती व्यक्ती (दोन्ही व्यक्ती, मुलगा आणि मुलगी) नजरेखाली ठेवावे लागतील
ते सर्टीफिकेटही कितपत विश्वासार्ह आहे, ते बघावे लागेल.>>> सध्यातरी HIV test चे reports काहीही फेरफार न करता मिळत आहेत... पण जर हे बंधनकारक केलं गेलं तर मात्र त्यात फेरफार होवु लागतील
अश्या वेळेस false negative ची शक्यता जास्त असते (म्हणजे HIV infected असतानाही टेस्ट निगेटिव्ह येने).. १/२ तासात HIV psitive/negative कळु शकेल अश्याही टेस्ट आहेत, पण या confirmatory tests नसतात..
टेस्ट positive येते म्हणजे hiv infection नंतर ज्या antibody शरीरात तयार होतात त्या डिटेक्ट केल्या जातात.. या antibody तयार व्हायलाच ३-६ महिने लागतात.. म्हणुनच window period महत्वाचा असतो..

तश्या शंका बर्‍याच असतात हो पण शेकडो चुकिच्या रिपोर्ट मधे एखादा बरोबर दिला जाईलच की त्यातही आपल्या कामाचं समाधान मिळेल. तुमच्या मतांचं स्वागत आहे पण मला कामाच्या आधी अडचणींची चर्चा........>>>> काम चालु करायच्या आधीच काय काय अडचणी येवु शकतात आणि त्या दुर करायला काय करता येइल यावर आधीच विचार केलेला बरा.... अशी संस्था चालु करायची असेल तर १००मधे एखादा बरोबर रिपोर्ट हा रेशो योग्य नसुन १००मधे एखादाच चुकिचा रिपोर्ट असाच रेशो असायला हवा... सध्यातरी या बाबतीत्ल अडचण येनार नाही...
झट मंगनी वाल्यांचे काय करणार ???? >>> अश्यांकरता PCR टेस्ट वापरता येइल.. यात व्हायरस चा जिनोम डिटेक्ट केला जातो.. पण कदाचीत यातही १-२ आठवड्यांचा काळ असा असतो की त्यामधे hiv infection असुनही टेस्ट निगेटिव्ह येवु शकते (मला नीट आठवत नाहिये याबाबतीत)
त्या क्षणी ज्याना असा अजार आहे. त्यांच्या नियोजीत वर्/वधुचं तरी कल्याण होईल ना?>>>> १००% सहमत...
शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये >>>> शहरी भागातही याबाबतीत प्रचंड कठीण आहे..

जर recent इन्फेक्शन असेल तर PCR टेस्ट पॉसिटिव्ह येते... जर ELISA (यात HIV antibody डिटेक्ट करतात) negative आली तर परत ३ महिन्याने टेस्ट करावी लागते.. आणि दुसरी टेस्टही निगेटिव्ह आली आणि मधल्या काळात HIV शी संबंध आला नसेल तरच ती व्यक्ती HIV निगेटिव्ह आहे असं म्हणता येईल..
वहायच्या आधी वळणे कशी आहेत याचा जो अंदाज येईल त्यापेक्षा वाहता वाहता अनुभवाने पक्का रस्ता सापडेल.>>>> तसं नको.. सुरुवातीपासुनच जेव्हडे जमतील तेव्हडे प्रॉब्लेम्स माहित असलेले बरे.. कारण प्रत्यक्ष काम करताना कधिही विचार केले नसतील असे प्रॉब्लेम्स समोर येतात..


अजुन एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, काही वेळा निरोगी लोक HIV vaccine च्या clinical trial साठी volunteer असतात.. अश्यावेळेस अश्या व्यक्तींची टेस्ट HIV infection नसतानाही पॉसिटिव्ह येते ...

व्हायरस म्हणजे अँटीजन फक्त पी.सी.आर.टेस्टने डेमॉन्स्ट्रेट करता येतो.>>> व्हायरस चा जिनोम पी.सी.आर टेस्ट ने डिटेक्ट करता येतो.. अँटीजेन म्हणजे व्हायरल प्रोटिन्स (e.g.p24), हे एलायझा ने टेस्ट करता येतात.. पण या दोन्ही टेस्ट खूप महाग असतात म्हणुन वापरत नाहीत..


त्याच बरोबर वधु व वराकडल्यांनी हा अपमान वगैरे मानून घेऊ नये.>>> त्याना तो अपमान वाटू नये इतपत त्याची योग्यता बिंबवणे हेच तर आपल्यासारख्यांचे काम आहे.
१) मिळणार सर्टिफिकेट तरी बरोबर असेल का? आजकाल भ्रष्टाचार इतका बोकाळलाय की पॉझेटिवला निगेटिव करणे खुप अवघड नाही.
२)लग्नापुर्वी नेगेटीव असणारा माणुस (स्त्री/पुरुष) लग्नानंतर पॉझेटिव होणार नाही कशावरुन??
>>>> या गोष्टींची खबरदारी घेण्यासाठीच एका विश्वसणीय मध्यस्थाची आवश्यकता आहे. कुणीही स्वतःहून हे करुया म्हणनार नाही पण मध्यस्त असेल तर गोष्टी सोप्या होतील. लग्नाळूंना पुर्वकल्पना दिली जाऊ शकते. लग्न ठरते आहे हे समजताच कामाला सुरूवात होईल. शेजार्‍यांना सांगा, पाहुण्यांना सांगा, कंपनीत सांगा. तुम्ही बोलून पहा लोक हे स्विकारतील फक्त कुणीतरी सांगणारा हवा. समजाऊन देणारा हवा. 

अश्या अनेक केसेस आहेत जिथे ३-६ महिन्यांचा काळ नसतो... अश्यांसाठी काही उपाय आहे का?
>>> पुढच्या वर्षी लग्न करायचे आहे हे तर माहिती असतेच ना. त्या दरम्यान ठराविक कालावधीत तपासणी करा.
आणि हे जरी शक्य नसलं आणि बर्‍याच अडचणी असल्या तरी त्या क्षणी ज्याना असा अजार आहे. त्यांच्या नियोजीत वर्/वधुचं तरी कल्याण होईल ना?

असा कायदा करायला पुढचे शतक उजाडेल.>>> येत्या विस वर्षाच्या आत हे होईल. ही भविष्यवाणी नव्हे लोकांचे बदलते विचार आणि एकुण जीवनमान बघता अगदी विश्वासाने असे म्हणता येईल. हा माझा विश्वास आहे.

तिथे एच. आय. व्ही. विषयी अशा प्रकारची जागरूकता आणणे प्रचंड आव्हानात्मक ठरावे परंतु अवघड नक्कीच नाही.... >>> येस विजयदा. अवघड नाही. आपल्यासारख्या अनुभवी मेंदूचा वापरच पुरेसा आहे. सगळ्याच मायबापाना वाटतय की पोरीचं/पोराच कल्याण व्हावं पण तोंड उघडायचं कुणी हा सवाल आहे त्याचा जवाब देणारे माबोकर त्याना भेटले की झालं... यकदम सोप्प आहे....

अशी संस्था चालु करायची असेल तर १००मधे एखादा बरोबर रिपोर्ट हा रेशो योग्य नसुन १००मधे एखादाच चुकिचा रिपोर्ट असाच रेशो असायला हवा... >>> अर्थात तो रेशो तसाच रहावा म्हणून आपण सजग राहू.
त्या दुर करायला काय करता येइल यावर आधीच विचार केलेला बरा....>>> नक्कीच, पण मला इतकेच म्हणायचे आहे की वहायच्या आधी वळणे कशी आहेत याचा जो अंदाज येईल त्यापेक्षा वाहता वाहता अनुभवाने पक्का रस्ता सापडेल.

ओके चिमुरी,
तुम्हाला ज्या अडचणी येतील असे वाटते आहे त्या तुम्ही सलग मांडा. मांडताना हे लक्षात ठेवा की
आपण लोकांना १. लग्नापुर्वी ही तपासणी किती व का महत्वाची आहे २. तपासणीची शास्त्रीय माहिती ३. ती तपासणी उपलब्ध असणारी ठिकाणे व खर्च ४. आजार होण्याची कारणे व अशा आजारापासून दूर राहण्याचे मार्ग इ. माहिती पुरविणार आहोत. आपले महत्वाचे काम असेल लोकांची मानसिकता बदलून एक प्रथा म्हणून ही तपासणी विवाहसंस्थेत रुजविणे. त्यासाठी आपल्याला गरज आहे ज्ञानाची, तज्ञांची, आपल्या संभाषण कौशल्याची आणि काम करण्याच्या बिनशर्त, निस्वार्थ तयारीची.

इथल्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या... विचार चांगला आहे.
मला एक शंका आहे, समजा ठरल्याप्रमाणे दोन्ही बाजूंची एच आय व्ही टेस्ट करून घेतली... मुलगी किंवा मुलगा एकाची पॉझिटिव्ह आली, लग्नं मोडलं, तर दुसर्‍या बाजूच्या मंडळींकडून सिक्रसी मेंटेन करण्याची गॅरेंटी कोण घेऊ शकेल? त्यासाठी काही कायदा सुव्यवस्था? तो ज्याच्या त्याच्या मॅच्यूरिटीचा प्रश्न आहे हे खरं... पण समाजात शाब्दिक आग लावणारे लोक कमी नसतात. आधीच एच आय व्ही डिटेक्ट झाला म्हणून अर्धमेली झालेली माणसं, बदनामीमुळे अजून दबली जाऊन सामुहिक आत्महत्या पण करू शकतील..

हबा माझा प्रश्न वेगळाच आहे... मी सिक्रसी मेंटेन करण्याविषयी विचारलंय..
मानसिक आधार तर प्रत्येक जण आपापल्या परिने मिळवेलंच...


आधीच एच आय व्ही डिटेक्ट झाला म्हणून अर्धमेली झालेली माणसं, बदनामीमुळे अजून दबली जाऊन सामुहिक आत्महत्या पण करू शकतील..
>>> कदाचित नाहित पण करणार, शक्यतांवर विसंबून चालणार नाही. एचआयव्ही पॉसिटीव्ह आहे यात दोष किंवा अनावधान त्या व्यक्तिचे आहे. त्याने व त्याच्या कुटूंबाने ही गोष्ट मान्य करायला हवी. वर जेव्हा हे एका संस्थेच्या माध्यमातून समोर येईल तेव्हा ती संस्था त्याना मानसिक आधार शास्त्रीय माहिती व पुढचे मार्गदर्शन करेलच. पण जर ते सामुहिक आत्महत्या करू शकतात म्हणून तपासणीच टाळली तर निर्दोष मुलिचा/मुलाचा खून होईल त्याचं काय? त्याच मुलाने ही गोष्ट दडवून आपल्याच नातेवाईकातली मुलगी पाहिली व ही गोष्ट आपल्याला कळाली तर तीला वाचविणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याला एड्स झाला हा त्याचा दोष असेल किंवा नसेलही पण जर त्याने कळाल्यानंतरही लग्नाचा विचार केला तर तो गुन्हा/घात आहे.

मी सिक्रसी मेंटेन करण्याविषयी विचारलंय..
>>> ती मेंटेन करणं ज्या वेळी कुणाच्यातरी जीवासाठी धोकादायक ठरेल तेव्हा ती करू नये. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उगाच बदनामी करत फिरणार्‍यांना एड्सच लागतो असे नाही. निर्व्यसनी मुलाला अट्टल दारूडा घोषित केले जाते. बालब्रह्मचार्‍याची दहाबारा लफडी रसभरीत वर्णन करून सांगितली जातात. हे प्रकार आहेतच पण समाजाच्या व्यापक फायद्यासमोर अशा गोष्टींचा विचार करणे अयोग्यच ठरावे असे वाटते.
तरीही तुम्ही विचारताय म्हणजे अशा गोष्टींवर काही उपाय / पर्याय तुमच्याकडे असेलच तो मांडलात तर अधिक बरे होईल.

हबा,
संपुर्ण पाठींबा या विचाराला. फक्त एकच वाटते की याबाबतीत आधी जनजागृती(विशेषतः ग्रामीण भागात) आणि इन्फ्रास्ट्रक्चर विशेषतः नि:स्पृह/त्रयस्थ तपासणी केंद्र हे आधी व्हायला हवे. (जर तिथेही काँप्रोमाईझ्ड रीपोर्ट्स मिळणार असतील तर मात्र हे नुसते रद्दीभरणे होईल).


शुभांगी हेमंत | 8 December, 2010 - 14:53
अतिशय चांगली कल्पना आहे. एच आय व्ही बद्दल जनजागृती आपण कितीवेळा ऐकतो. पण खरच सगळ्या गोष्टी अमलात येतातच अस नाही. पण स्वतःपासुन सुरवात या अनुशंगाने खरच लग्नापुर्वी एच आय व्ही टेस्ट बंधनकारक करावी. कित्येक निष्पाप जीव वाचतिल यामुळे.
पण परत पुढचे प्रश्न आहेतच
१) मिळणार सर्टिफिकेट तरी बरोबर असेल का? आजकाल भ्रष्टाचार इतका बोकाळलाय की पॉझेटिवला निगेटिव करणे खुप अवघड नाही.
२)लग्नापुर्वी नेगेटीव असणारा माणुस (स्त्री/पुरुष) लग्नानंतर पॉझेटिव होणार नाही कशावरुन??
पण हे ही नसे थोडके या उक्तीवरुन ही टेस्ट बंधनकारक करावी हे माझ मत.




टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे असे मलाही वाटते पण वर चिमुरीने लिहिलेय ते मीही ब-याच ठिकाणी वाचलेय. त्यामुळे लग्नाच्या तारखेच्या आधीचा रिपोर्ट घेऊन फारसा फायदा होणार नाही असे वाटते.
provided there is no HIV incidence in this period हे महत्वाचे आहे पण याची खात्री कोण देणार?

चांगला विचार आहे. आपण 'विवाह सुचक मंडळांना' सुचवु शकतो की मुला-मुलिंची नाव नोंदणी करुन घेतानाच HIV Test Report बंधनकारक करावा आणि लग्न जमत असेल तर पुन्हा एकदा Test करायला सांगावी. तसेच लग्न अजुन जमले नाहिये पण सुरुवातिला दिलेल्या report ची validity संपली असेल तर पुन्हा report submit केल्याशिवाय त्यांना पुढे कुठल्या मुला/मुलिंची माहिती / संपर्क देवु नये.
खेड्यात माहिती नाही पण शहरात तरी याचा काही फायद होऊ शकतो कारण शहरातही आपल्यासारखे सुशिक्शित सुद्धा HIV Test बद्दल अजुन तेवढे जागरुक नाहियेत.......... जागरुकता चर्चा करण्यापुर्तीच आहे.

शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये >> माझी एक अत्यंत जवळची मुंबईत वाढलेली मैत्रिण लग्नासाठी मुलं बघत होती.. तिला विचारलं की तुला एखादा मुलगा लग्नायोग्य वाटला तर त्याला असं सर्टिफिकेट मागशील का.. ती म्हणाली की तिला असं वाटत नाही की कुठला मुलगा हे अ‍ॅक्सेप्ट करेल..
समोरच्याच्या इगोकरता आख्खं आयुष्य पणाला लावणं मला तरी बरोबर वाटलं नाही! मी समजवण्याचा प्रयत्न केला .. पण तिला लॉजिकली ते पटलं तरी she was not ready to go ahead with that. अरेरे
त्यामुळे कायदा आला तरच बदल शक्य होईल (हळूहळू का होईना)
डेलिया, तू म्हणतेस ती माणसं "मॅच्युअर" कॅटेगरीतली असतात. माहित असूनही फसवणारेच जास्त सापडतील.
विवाहसूचक मंडळाचा उपाय चांगला वाटतो - पण तो बिझनेस असल्यानं येणार्‍या उपवर लोकांनीही मान्य केलं तरच हे रुजलं जाण्याची शक्यता जास्त. कायदा हाच उत्तम उपाय.. काहीजण पळवाटा शोधतीलही.. पण काही जण वाचू शकतील.. जितका जास्त काळ जाईल तितका हा विचार समाजात रुजेल..
बरोबर, पण ते वाक्य मी दक्षिणाच्या पेशंटच्या 'सिक्रसी' च्या मुद्याला उद्देशुन लिहिले होते. पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का. >> आपला मुद्दा सारखाच आहे म्हणजे!
हे बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत होते. इथे 'टेस्ट हवी' लिहीणार्‍यांपैकी तरी कोणी टेस्ट केलीये का लग्नाआधी ?
>> आम्ही लग्न करायचं असं कॉलेजच्या दिवसात ठरवलेलं.. ठरवलं तेव्हा HIV बद्दल काहीच जागरूकता नव्हती.. शब्दही ऐकला असेल जेमतेम. त्यामुळे तसा काही प्रश्नच नव्हता! (आणि हबांच्या मैत्रिणीचं उदाहरणच बघ ना.. तिनं केली नव्हती टेस्ट लग्नाआधी - पण म्हणून तिनं लोकांना सांगायचं नाही का? इन फॅक्ट तिला त्याचे परिणाम चांगलेच माहिती आहेत, त्यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते!)
आज इतकी जागृती झालेली असताना, अशा केसेस माहित असताना केवळ समाजाच्या भितीनं तसं पाऊल न उचलणं पटत नाही..
प्रत्येक घटना फसवणुक नसणार आहे, त्यामुळे समाजाने सिक्रेसीची, सहानभुतीची तसेच आधाराची चिंता जरुर करायला हवी असे वाटते. >> ह्या बाबतीत वेगळ्या पातळीवर जनजागृती होणं गरजेचं आहे..
आमच्या पुण्यातल्या कामवाल्या बाईचा नवरा एडस नं गेला हे सोसायटीत पसरलं आणि बर्‍याच जणांनी तिला कामावरून काढून टाकलं. असं सरसकट वाळीत टाकणं अगदीच बरोबर नाही.. आधीच ती व्यक्ती मानसिक/शारिरीक/आर्थिक रित्या खचलेली असू शकते - त्यात पुन्हा असं बाकीच्यांनी वागणं अगदीच चूक.. व्याभिचारामुळे HIV होतो हाच तर मोठा गैरसमज आहे >> मुळात कुठल्याही कारणामुळे रोग झाला तर वाळीत टाकणं बरोबर नाही.. हा तर संसर्गजन्य रोगही नाहीये की सहज स्पर्शातून, श्वासातून होईल..समाजाच्या कुष्ठरोगाचं आधुनिक रूप झालं हे!
पण HIV ग्रस्त/एडसग्रस्त लोकांशी समाजाची वागणूक आणि लग्नाआधी HIV positive असून आणि हे माहित असून दुसर्‍या व्यक्तीला मृत्यूच्या दारात पाठवणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माहित असूनही फसवणूक करणारे महाभाग कमी नाहीत - हे होऊ नयेत म्हणून कायदा होणं गरजेचं.
(HIV ग्रस्त/एडसग्रस्त लोकांशी समाजाची वागणूकीकरता जनजागृतीची गरज आहे- हे अगदी मान्य! )
किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत
>> जर लोकं पैशाकरता शवागारातला बर्फ गुर्‍हाळात विकू शकतात, जखमांवरचा कापूस ब्लीच करून कान साफ करायचे बड्स करू शकतात, तर सेम लोक पैशाकरता/हलगर्जीपणानं काहीही करू शकतील असं वाटतं (करत असतीलच असं नाही.. पण शंका/भीती वाटतेच!)
असा कायदा व्हावा असे मनापासुन वाटते.
दक्षिणाचे म्हणणे ही पटले. म्हणुनच लग्नाला उभे रहाण्यापुर्वीच जर मुला मुलींनी स्वतःची टेस्ट करुन घेतली तर अशी बेइज्जती टळू शकेल. नाहीतर लग्न ठरल्यावर टेस्ट करुन ती पॉझिटीव्ह आल्यास ते सगळीकडे पसरणारच. अर्थात पण कोणाची तरी सीक्रसी जपण्यासाठी दुसर्‍या निरपराध माणसाचा जीव धोक्यात जात असेल तर त्या सीक्रसीची चिंता करणे मलातरी मुर्खपणाचे वाटते.
कायद्यातुन पळवाटा काढणारे , तो न मानताच पुढे जाणारे खुप लोक असतील परंतु त्या आधाराने एका व्यक्तीचा जरी जीव वाचु शकला तरी त्या कायद्याचे सार्थक होईल.
अता लग्नाचे किमान वय, हुन्डाबंदी असे कायदे आहेतच की आणि ते तोडणारे पण आहेत. तरीही त्या कायद्यांचा कुठेनाकुठे थोडाफार फायदा होतोच आहे.
तसेच HIV चा पण कायदा झाल्यास हळू हळू का होईना पण फायदाच होईल. शिवाय अत्ता मनात असुन सुद्धा या विषयावर बोलणे, असा आग्रह धरणे मुला किन्वा मुलीकडच्यांना अवघड वाटू शकते. तेव्हा कायदा झाला तर ते सोप्पे होईल.
अता इथे मायबोलीवर लिहिणारे सर्व उच्चशिक्षित आहेत पण ज्यांची गेल्या १० वर्षात लग्ने झाली आहेत त्यापैकी किती जणांनी अशा टेस्ट करुन घेतल्या आहेत ? माझ्या माहीतीत तर आजपर्यंत कोणीही नाहीये. हेच चित्र कायदा झाला तर नक्कीच बदलू शकेल.

---HIV वाइटच पण मधुमेह जास्त जणांना मारतो.----
अगदीच चुकीची तुलना आहे. मधुमेह हा संसर्गजन्य रोग नव्हे. तुमच्यामुळे तुमच्या पार्टनरला होणार नाही. तसे इतरही अनेक आजार आहेत की ज्यात भरपुर लोक मरतायेत , मलेरिया, कावीळ,कॅन्सर सारखे. पण त्याची तुलना HIV बरोबर करु नये.

--डेलिया, तू म्हणतेस ती माणसं "मॅच्युअर" कॅटेगरीतली असतात. माहित असूनही फसवणारेच जास्त सापडत---- बरोबर, पण ते वाक्य मी दक्षिणाच्या पेशंटच्या 'सिक्रसी' च्या मुद्याला उद्देशुन लिहिले होते. पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का.
--माझी एक अत्यंत जवळची मुंबईत वाढलेली मैत्रिण लग्नासाठी मुलं बघत होती.. तिला विचारलं की तुला एखादा मुलगा लग्नायोग्य वाटला तर त्याला असं सर्टिफिकेट मागशील का.. ती म्हणाली की तिला असं वाटत नाही की कुठला मुलगा हे अ‍ॅक्सेप्ट करेल..
समोरच्याच्या इगोकरता आख्खं आयुष्य पणाला लावणं मला तरी बरोबर वाटलं नाही! मी समजवण्याचा प्रयत्न केला .. पण तिला लॉजिकली ते पटलं तरी she was not ready to go ahead with that ---
हे बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत होते. इथे 'टेस्ट हवी' लिहीणार्‍यांपैकी तरी कोणी टेस्ट केलीये का लग्नाआधी ? आम्ही तर नाही. अत्तापर्यंत एकानेही लिहिले नाहीये की आम्ही अशी टेस्ट करुन घेतली होती म्हणुन. लोकांना सांगायला सगळेच पुढे असतात पण स्वतःवर वेळ आली की सगळेच विसरायला होते. म्हणुनच तर कायदा हवा.

हिवरे बाजार या गावाचे नाव तेथिल सुधारणांमुळे बरेच चर्चेत आहे. इतर सुधारणांबरोबरच त्या गावात लग्नापुर्वी HIV टेस्ट करुन घेण्याचा पंचायतीने\गावकर्‍यांनीच नियम बनवला आहे. आणि तो पाळला ही जातो असे ऐकले. अशा सुधारणांसाठी सुशिक्षित असण्याची नव्हे तर समंजस असण्याची गरज आहे.


सिक्रेसी ला भारतात खुप अर्थ नाही आहे. सहज पणे माहिती परभारे सांगितली जाते, एखाद्याने सांगितली तरी आपण त्या प्रकाराला खुप गंभीर गुन्हा मानत नाही (येथे सरळ नोकरी जाते).
लग्ना करण्या अगोदर दोघांनाही परस्परांच्या HIV बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कुंडली दाखवण्याच्याही आधी हा योग जुळवणे. मी माझी (वा भावी पत्निची) परिक्षा केलेली नव्हती पण म्हणुन मी चांगला सल्ला देण्याची संधी दवडणार नाही स्मित. मला आज लग्न करायचे असेल तर जरुर परिक्षा करेल.
कायद्याने खुप काही साधता येईल या बद्दल मी साशंक आहे. गर्भजल परिक्षेवर बंदीचे काय होते? किती लोकं त्यांचे पालन करतात ? आता डॉ. च्या हालचालींवर नजर ठेवायला अजुन एक रोबोट आला आहे.

पण अशाच फसवू पहाणार्‍या किन्वा बेपर्वा लोकांच्या सिक्रसी ची चिंता समाजानी किन्वा दुसर्‍या पार्टी नी कशाला का करावी आणि आपल जीव धोक्यात टाकावा नाही का ?
---- HIV आहे हे अगोदर माहित असेल तर असणारी व्यक्ती टेस्ट करणारच नाही वा ते करण्याची टाळाटाळ करतील. बहुतेक +ve घटनांत त्या व्यक्तीला पण आपण व्याधी ग्रस्त आहोत हे प्रथमच समजणार असेल (म्हणुन धक्कादायकच असेल). प्रत्येक घटना फसवणुक नसणार आहे, त्यामुळे समाजाने सिक्रेसीची, सहानभुतीची तसेच आधाराची चिंता जरुर करायला हवी असे वाटते. लग्न नका करु पण एक मित्र मैत्रिण बनुन आधार जरुर देता येतो. स्वत:चा काही दोष नसतांना पण HIV होण्याची शक्यता असते.

कित्येकांना दूषित रक्त चढवून घेतल्याने मिळालेला असतो... <<<
किमान इस्पितळे तरी रक्त चढवताना इतकी मूलभूत काळजी घेत नाहीत?
---- भारतात रक्त दात्याच्या रक्ताचे स्क्रिनींग होण्याचे प्रमाण किती आहे? सर्व ठकाणी, सर्व चाचण्यांच्या सुविधा अजुनही उपलब्द नसाव्यात - प्रश्न अर्थिक सुबत्तेचा आहे.
गर्व से कहो हम HIV -Ve है ---- या गर्वाची आवश्यकता नाही आहे. डॉ. च्या मताला दुजोरा.

अगदी योग्य मुद्दा उपस्थित केलात ह. बा.,
शहरी भागात ह्याची गरज बिंबवणे आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळवणे(प्रत्यक्ष सहभागा बाबतीत) फारसे कठीण होऊ नये परंतु खरी गरज ग्रामीण भारतात(सुरुवात महाराष्ट्रापासून करायला हरकत नाही) आहे जिथे ह्या सर्व गोष्टींबद्दल एक प्रकारची उदासिनता भरलेली आहे.
मुळात काही काही ठिकाणी अजून मुलीचे लग्न १८ व्या आणि मुलाचे लग्न २१ व्या वर्षी करण्याचा कायदा(?) अंमलात आणला जात नाहीये, तिथे एच. आय. व्ही. विषयी अशा प्रकारची जागरूकता आणणे प्रचंड आव्हानात्मक ठरावे परंतु अवघड नक्कीच नाही....
ह्यावर विचार करता आला तर पाहूया!!
लेखात दिलेल्या संकल्पनेशी संबंधीत उपयुक्त माहिती देणार्‍यांचे स्वागत आहे. आपल्या माहिती, संपर्क, अनुभवाचा आम्हाला प्रत्यक्ष कृतीत उपयोग होणार आहे.>>> १००% अनुमोदन, चांगल्या कामाला आपण उपयोगी कसे पडू ह्याचा सर्व लोकांनी विचार करावा आणि तशा गोष्टी सांगाव्यात.
काम सुरूही झाले आहे...काँट्रीब्युट न करता उगाच नस्त्या शंका उपस्थित करण्यात काय अर्थ आहे?
एका कवितेचा मतितार्थ सांगतो,
"अस्तमानात विलीन होत असताना सुर्यनारायणाने एक प्रश्न केला, "आता माझे काम कोण करील?", स्तब्ध झाला सारा आसमंत.....सगळे एक्दम चिडीचूप!! कोणीच बोलत नाही हे पाहून एक पणती पुढे झाली आणि उद्गारली...........मी करीन परंतु माझ्या कुवतीनुसार!!!"
आम्हाला असे स्वतःहून पुढे येणार्‍या लोकांची नितांत गरज आहे....

ग्रामीण महाराष्ट्रात सुरूवात करण्यासाठी माझं नाव लिवा हणमंतराव !
धन्यवाद!!

ही गोष्ट कायद्याने करण्यापेक्षा समाजजागृतीने करणेच योग्य आहे. म्हणजे लग्न जुळवताना वधु वरांनी परस्परांना आपण अनुरूप आहोत की नाही हे पहाताना रक्तगट व तत्सम गोष्टी तपासून पहाव्यात.
एचआयव्ही बाधित व्यक्तीला वाळीत टाकण्याचेच पुढचे पाऊल असे याचे स्वरूप होउ नये.(जसे एचायव्ही बाधित मातापित्यांच्या +/- मुलांच्या बाबत होताना दिसते, किंवा कुष्ठरोगाबाबत व्हायचे, अजूनही होत असेल.)
कुणाला एचायव्ही + व्यक्तीशी विवाह करायचा असेल, किंवा २ एचायव्ही + व्यक्तींना लग्न करायचे असेल, तर त्यावर बंदी आल्यासारखे होईल.
एचायव्ही बाधित व्यक्तीने आपला संसर्ग अन्य कोणास होणार नाही, याची काळजी मात्र घेतलीच पाहिजे, मग ती व्यक्ती विवाहित असो वा अविवाहित.

माझ्या ओळखीत आहेत २-३ जोड्या लग्नाआधी HIV अन इतर तपासण्या केलेल्या. आम्ही दोघांनीपण केली होती ही टेस्ट अन इतरही काही रुटीन तपासण्या लग्नाआधी.
आपल्याकडे एकंदरीतच एडस या शब्दाला जो सोशल स्टिग्मा आहे, त्यामूळे हे सिक्रसी वैगरे सगळं येतं. नुसता कायदा करून खूप काही होणार नाही, (आणि कायदा म्हटलं की पळवाटा पण येतात)तर सतत बोलल्याने, चर्चेने ही बाब सगळ्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.
सिक्रसीबद्दल म्हणायचं तर याबद्दल खरचं अतिशय वेगळे कायदे आहेत. स्वेच्छा रक्तदान शिबिरांमधून रक्त गोळा केल्यावर त्यावर ही टेस्ट केली जाते. जर एखाद्या सँपलचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर ती बॅग डीस्ट्रॉय केली जाते, पर्म्तू त्या रक्तदात्याला तो /ती HIV पॉझिटिव्ह आह ही माहिती दिली जात नाही. अशी माहिती देणे कायद्याने गुन्हा आहे. अगदी रक्तदान केल्यानंतर जर एखाद्याने रक्तपेढीत येवून विचारले तरी त्याला सांगता येत नाही बहूतेक. त्याला टेस्ट करायचा सल्ला दिला जातो.
आमच्या कॉलेजात ज्यावेळी रक्तदान शिबिरं व्हायचं त्यावेळी तिथले प्राचार्य आईला सांगून ठेवायचे की जर एखादं सँपल पॉझिटिव्ह आलं तर कळवा. वैयक्तिक संबंधांमूळे अशावेळी प्राचार्यांमार्फत आणि यावर काम करणार्‍या मेडिकल सोशल वर्करच्या मार्फत अशा विद्यार्थ्याच्या पालकांना त्याची परत टेस्ट करवण्यासाठी समजवावे लागे. परंतू हे खरंतर कायद्यात बसत नाही.
(आई शासकिय रक्तपेढीत मेडिकल सोशल वर्कर आहे, म्हणून ही थोडीशी माहिती मिळाली)
आपण खरच काही उद्योग केले असतील तर दुसर्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा करायचा आपल्याला हक्क नाही हे जाणून टेस्ट करायला काय हरकत आहे...आणि नसेलही काही केलं तरी दुसरीकडुनही एड्स होण्याची शक्यता आहेच म्हणुनच मी आणि माझ्या नवर्याने टेस्ट केली होती...विशेष काय त्यात?

डॉक्टर तुमची मोलाची मदत होते आहे. आपण मान्यता दर्शविलीत त्याबद्दल आभारी आहे.
मी आणि माझी बायको लग्नापुर्वी सात वर्षे आणि लग्नांतर तीन वर्षे अशी एकूण १० वर्षे एकमेकांना ओळखतो. विश्वास आहेच पण तरीही टेस्ट आम्ही केली होती. कोल्हापुरात असताना तिने आकाशवाणीवर याविषयी एक कार्यक्रमही केला होता.
मी यापुर्वी काही संस्थांसाठी कामे केली. अनाथाश्रम, विटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या संस्थेतल्या मुलांसाठी स्पर्धा घेतल्या त्याना मदत केली. थोडं बहुत काम केलं आहे. आपल्या मित्रा-मित्रांची अशी संस्था असावी अशी माझी मनिषा आहे. मी एकदा शिरोळच्या महापुरात नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी चार पाच मित्रांसोबत गेलो तर तिथे आम्हाला कोणत्या संस्थेतून आला? ओळ्खपत्र दाखवा इ. प्रश्न विचारून आमची मदतही घेतली नाही. तुम्ही चोरही असू शकता असेही सुनावले गेले. त्यामुळे एक कायदेशीर शिक्का मारून घेणे गरजेचे आहे.
या कामांसाठी अगदी गटगही कॅन्सल करावा लागणार नाही. एवढे फ्लेक्झिबल नियोजन असेल. ज्याला जसे जमेल तसे काम वयक्तिक पातळीवर सुरू करावे. फक्त नोंदणी केलीत तर आनंदच आहे.
याचिका दाखल करणे, कायद्याची मागणी करणे, इ. साठी पुवेका केव्हापासून तयार आहेत.
दोन फोटो, ओळखपत्र, संपर्क, पत्ता. पाठवून देणे. एवढेच तुमचे काम असेल.
विजयजी, किश्या, डॉक्टर आपली सुरूवात झाली आहेच. त्याबद्दल आपण एकमेकांचे आभारी आहोत.

**************************************************************************************

अशी अनेक मते-मतांतरे यांची ओळख करून घेतल्यानंतर आम्ही काही समविचारी मित्र-मैत्रीणींनी एकत्र येवुन प्रत्यक्ष कृतीला हात घालायचे ठरवले. आणि तिथेच "मैत्र जिवांचे सामाजिक संस्थेची" मुहुर्तमेढ झाली.

धन्यवाद.

विशाल विजय कुलकर्णी
सचिव
'मैत्र जिवांचे सामाजिक संस्था'
भ्रमणध्वनि क्र.: ९९६७६६४९१९
विरोप पत्ता : maitrajivanche.ngo@gmail.com

 
 





"सामाजिक संस्था म्हणजे समाजाची, समाजाच्या हितासाठी काम करणारी संस्था. आपण फक्त त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणुन काम करत असतो. आपले काम कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता करत राहणे एवढेच आपले कर्तव्य."

कृपया नोंद घ्यावी की ब्लॉगवर देण्यात आलेल्या माहिती आणि माहितीविषयक बाह्य दुव्यांवरील माहितीच्या वैधतेबद्दल "मैत्र जिवांचे सामाजिक संस्था, मालखेड, जि. सातारा" कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. या माहितीवर अंमल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा होवू शकणार्या कुठल्याही परिणामाला संस्था जबाबदार राहणार नाही. आपली इच्छा असल्यास संस्थेचे डॉक्टर्स आपल्याला हवी ती सर्व माहिती विनामुल्य अथवा अतिशय वाजवी दरात (जर बाहेरील डॉक्टरचे नाव सुचवले तर) पुरवू शकतील. इच्छुकांनी कृपया maitrajivanche.ngo@gmail.com या विरोप पत्त्यावर संपर्क साधावा.

"मैत्र जिवांचे सामाजिक संस्था", मु.पो. मालखेड, ता. कराड, जि. सातारा.